मुंबई इंडियन्सचा शानदार विजय   

लखनऊ : वुमेन प्रिमिअर लीगच्या १६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा धुव्वा उडवला. यूपीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना १५० धावा केल्या आणि मुंबई इंडियन्ससमोर १५१ धावांचं लक्ष ठेवले. यूपीचे हे आव्हान मुंबई इंडियन्सने १८.३ षटकांमध्ये सहजरीत्या गाठले. मात्र, या सामन्या दरम्यान, प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि युपीची खेळाडू सोफी एक्सेस्टोन मैदानात भिडलेलय पाहायला मिळाल्या. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 
 
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यूपीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात मैदानात उतरला होता. यूपीकडून सोफी नंबर ९ वर फलंदाजीसाठी उतरली होती. दरम्यान, १९ वे षटक सुरु झाल्यानंतर हा वाद झाल्यावर पाहायला मिळाला. स्लो ओव्हर रेटमुळे क्षेत्ररक्षणावर मर्यादा आल्याने वाद वाढल्याचे पाहायला मिळाले. अम्पायरने हरमनप्रीतला सांगितले की, शेवटच्या षटकात ३० यार्डच्या सर्कल बाहेर तीन क्षेत्ररक्षक ठेऊ शकता येतील. 
 
अंम्पायरने सांगितलेला नियमानंतर हरमनप्रीत नाराज झालेली पाहायला मिळाली.३० यार्ड सर्कलच्या बाहेर जास्तीचा फिल्डर नसल्याने ती देखील चिंतेत पाहायला मिळाली. दरम्यान, यूपीची खेळाडू सोफी नॉन स्ट्राइक एंडवर होती आणि तिने अंपायरला काहीतरी सांगितले. यावर हरमनप्रीतचा राग वाढला आणि त्यांच्यात वाद झाला. मात्र, पंचांनी प्रकरण शांत केले.यूपीने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या होत्या. यूपीकडून जॉर्जिया वॉलने अर्धशतक झळकावले, तिने ५५ धावांची खेळी खेळली तर ग्रेस हॅरिसने २८ धावा केल्या. कर्णधार दीप्ती शर्माने २७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईने १८.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने ६८ धावांची खेळी केली.

Related Articles