जम्मू आणि काश्मीरचे अंदाजपत्रक सादर   

जम्मू : केंद्रशासित जम्मू आणि काश्मीरचे अंदाजपत्रक मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सादर केले. सुमारे सात वर्षानंतर अंदाजपत्रक सादर करण्यात आले. १.१२ लाख कोटी खर्चांचे ते असून त्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. 
 
अंदाजपत्रक आर्थिक विकास अणि नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुमारे साडेतीन वर्षानंतर शांतता निर्माण झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी विविध क्षेत्रांत अनमोल मदत केल्याचे गौरवोद्गार देखील काढले. पारंपरिक खान सूट, निळा कोट आणि डोक्यावर टोपी अशा वेषात ते आले होते. सुमारे दीड तास त्यांनी इंग्रजीत अंदाजपत्रक मांडले. या वेळी त्यांनी माझे शरीर जखमांनी भरले आहे. कुठे कुठे त्यावर मलम चोळू, असे पर्शियन वाक्य सांगून जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर एक प्रकारे बोट ठेवले. त्या वाक्याला उपस्थित आमदारांनी मेजावर थाप मारून साथ दिली.
 
ते म्हणाले, परिस्थिती बदलल्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली. अर्थव्यवस्था २०१९ ते २०२० मध्ये १ लाख ६४ हजार १०३ कोटी होती. २०२४ ते २०२४ दरम्यान ती २ लाख ४५ हजार २२ कोटींवर पोहोचली. २०२४ ते २०२५ मधये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रांंचा विकास २० टक्के अर्थात १८.३० टक्के  अपेक्षित धरला.  सकल घरेलु उत्पादन ६१.७० टक्के होते. पर्यायाने ते पुढील प्रगतीसाठी पाया ठरले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि प्रतिकूल वातावरणातही सामाजिक, आर्थिक  निर्देशांक चढते असल्याचे दिसते. 

Related Articles