तहव्वूर राणाचा आटापिटा सुरूच...   

न्यायालयात नव्याने अर्ज

वॉशिंग्टन : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याचा फेरविचार अर्ज नुकताच अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. आता त्याने सर न्यायाधीश जॉन रॉबर्टस यांच्याकडे नव्याने अर्ज सादर केला आहे. भारताकडे सोपविण्यासंदर्भात दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्याने अर्जाद्वारे केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही देशांमधील करारानुसार तहव्वूरला भारताकडे सोपविण्यात यावे, असा आदेश दिला होता. यानंतर, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. त्यानंतर, तहव्वूर याने फेरविचार अर्ज दाखल केला होता. मला भारताकडे सोपविले तर, माझा तेथे छळ होईल, असे त्याने अर्जात नमूद केले होते. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. आता त्याने याबाबत सरन्यायाधीशांनी निकाल द्यावा, असा अर्ज केला आहे.
 

Related Articles