पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता १३ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा ४ एप्रिल, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा १८ ते २० मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेचे निकष आणि प्रवेशप्रक्रियेबाबत अधिक माहिती https://campus.unipune.ac.in/CCEP/ Login.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
Fans
Followers