जॉर्जियाचे संयमी अर्धशतक   

लखनऊ : महिला प्रिमियर लीगमध्ये गुरुवारचा सामना मुंबई इंडियन्स आणि यु पी वॉरियर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना यु पी वॉरियर्सच्या संघाने २० षटकांत १५० धावा केल्या. यावेळी ८ फलंदाज बाद झाले. यावेळी युपी वॉरियर्सची सलामीवीर ग्रेस हॅरीस हिने २८ धावा केल्या. तर जॉर्जिया हिने ५५ धावा करत शानदार अर्धशतक केले. किरण नवगिरे शून्यावर बाद झाली.दिप्ती शर्मा हिने २७ धावा केल्या. वृंदा दिनेश हिने १० धावा केल्या. चिन्हे हेन्री हिने ६ धावा केल्या. श्वेता शेरावत एकही धाव न काढता तंबूत परतली. उमा छेत्री हिने १ धाव काढली. सोफियाने १६ धावा केल्या. क्रांती गौड हिने १ धाव काढली. तसेच अवांतर ६ धावा संघाला मिळाल्या. 

Related Articles