रिझवर्र् बँक बाजारात ओतणार ४० हजार कोटी   

वृत्तवेध 

लोक खर्च करत नसल्यामुळे बाजारात मंदी आहे. कितीही प्रयत्न केले, तरी बाजारात उलाढाल वाढायला तयार नाही. त्यामुळे रिझर्व बँक पुढील काळात अर्थव्यवस्था उजळवून टाकण्यासाठी एक युक्ती अवलंबणार आहे. रिझर्व बँकेकडून ४० हजार कोटी रुपयांची रोकड बाजारात आणली जाईल. रोखीचा हा प्रवाह बँकिंग प्रणालीद्वारे केला जाईल.रिझर्व बँक केंद्र आणि राज्य सरकारचे रोखे खरेदी करेल आणि ही ४० हजार कोटी रुपयांची रक्कम बँकिंग प्रणालीमध्ये टाकेल. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या करदात्यांना फेब्रुवारी महिन्यात गॅट किंवा प्राप्तिकर जमा करून मोठा दिलासा मिळेल. तिजोरीमध्ये पैसा आल्यानंतर व्यापारी किंवा मध्यमवर्गीयांना पैसा पुरवण्यात बँका मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना खर्चात अडचण येणार नाही.
 
सुरुवातीला रिझर्व बँकेने अर्थव्यवस्थेत फक्त २० हजार कोटी रुपये टाकण्याची घोषणा केली होती; परंतु अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता ती वाढवून ४० हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा उद्देश खप वाढवून बाजारपेठेत मागणी निर्माण करणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे हे आहे.भारत सरकारच्या अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदी आणि रिझर्व बँकेचे आर्थिक धोरण यांचा संबंध जोडून अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. भारतीय बाजारात गेल्या आठ आठवड्यांपासून तरलतेचे संकट कायम आहे. ७ फेब्रुवारीला तरलता १ लाख ३३ हजार कोटींवर पोहोचली होती. रिझर्व बँकेने रेपो दरात २५ अंकांची कपात केल्यानंतर तरलता वाढवण्याचे पाऊल जाहीर केले आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आश्वासन दिले, की केंद्रीय बँक सतर्क आहे आणि तरलता स्थिती राखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.

Related Articles