महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती   

आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई,  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५, ६३९ अंगणवाडी सेविका व १३, २४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
 
१४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत योग्य खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. महिला व बालविकास विभागातील विविध रिकाम्या पदांची भरती करण्याबाबत आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिकाम्या पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्या.यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त  कैलास पगारे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles