बीड : बीडमध्ये एका किराणा मालाच्या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी तेरा लाखांचा गुटखा जप्त् केला आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे परळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली.परळी ग्रामीण पोलिसांना क्यूआर कोडद्वारे गुटखा वाहतुकीची गुप्त् माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख लाल यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. यावेळी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ येथे आढळून आले. याची किंमत अंदाजे १३ लाख रुपये आहे. जप्त् करण्यात आलेल्या गुटख्याची अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हे तपासणी करून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.या अंतर्गत सर्वसामान्य नागरिक देखील अवैध धंदे तसेच एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाला माहिती देऊ शकतात. या ऑनलाइन तक्रारीचा किंवा कोड स्कॅन करून ही तक्रार तसेच माहिती देता येते. त्याच माध्यमातून ही तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती.
Fans
Followers