जर्मनीत रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू   

बर्लिन : जर्मनीतील हॅमबर्ग येथे रेल्वे आणि मालमोटार यांच्यात भीषण धडक झाली. रेल्वे मार्ग ओलांडणार्‍या मालमोटारीला रेल्वेने धडक दिली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वेतून २९१ जण प्रवास करत होते. रेल्वेने मंगळवारी एका मालमोटारीला धडक दिली होती. पोलिसांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना तातडीने बसने जवळच्या रेल्वे स्थानकावर नेले.

Related Articles