दिल्ली परिवहनच्या सहा अधिकार्‍यांना अटक   

सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपावरुन केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी दिल्ली परिवहन विभागाच्या सहा अधिकार्‍यांना अटक केली.दिल्लीत आम आदमी पक्षाला नुकतेच सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. सत्तांतरानंतरची ही पहिलीच कारवाई आहे.दिल्लीतील परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआयकडे तक्रारी आल्या होत्या. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईपूर्वी तक्रारींचे पडताळणी करण्यात आली. तक्रारींची पडताळणी करताना विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यानंतर सीबीआयने परिवहन विभागाच्या सहा अधिकार्‍यांना अटक केली.
 
सीबीआयच्या कारवाईबाबत काँग्रेसचे नेते उदित राज म्हणाले की, आम आदमी पार्टीचे सरकार भ्रष्ट होते. जल मंडळ गैरव्यवहार, कॅग अहवाल, मद्य धोरण गैरव्यवहार असे अनेक गैरव्यवहार  या सरकारच्या काळात झाले. आता भाजपचे सरकार आले आहे. नवीन सरकार प्रत्यक्षात भ्रष्टाचाराविरोधात कोणती कारवाई करते ते पाहूया.

Related Articles