भारताचा सलग तिसरा विजय   

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसाचा सामना बुधवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारताने १४२ धावांनी जिंकला. या सामन्यात  नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने ३५६ धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. याशिवाय विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके साकारली.  विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. 
 
तिसर्‍या एकदिवसाच्या सामन्यात विराट कोहलीने ५५ चेंडूत ५२ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यासह त्याने आशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण केल्या. तो आशियामध्ये सर्वात जलद १६००० धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने हे फक्त ३४० डावांमध्ये केले. आणि अव्वल क्रमांक मिळविला. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आशियामध्ये ३५३ डावांमध्ये १६००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या. आतापर्यंत आशियामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त चार फलंदाजांनी सोळा हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
 
इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक ४ बळी घेतल्या. तर मार्क वूडने २ बळी  घेतल्या. तर जो रूट आणि साकिब अहमद यांना १ बळी मिळाला.
 भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला आले. पण रोहित एक धाव घेत पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर गिलने विराट कोहलीसोबत टीम इंडियाचा डाव सांभाळला, गिल आणि कोहलीने दुसर्‍या बळीसाठी शतकी भागीदारी केली. यानंतर आदिल रशीदने कोहलीची शिकार केली. कोहलीने ५५ चेंडूत ५२ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.
 
यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात शतकी भागीदारी झाली. यादरम्यान शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. शुभमन गिलचे हे सातवे एकदिवसाचे शतक आहे. शुभमन गिल १०२ चेंडूत ११२ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. हार्दिक पांड्या ९ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल १३ धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून आदिल रशीदने ४ गडी बाद केले. भारताला पाचवा धक्काही आदिल रशीदने दिला. त्याने हार्दिक पांड्याला बाद केले. के एल राहुल ४० धावांवर तंबूत माघारी परतला. साकिब मेहमुद याने त्याला पायचित बाद केले. अक्सर पटेल १३ धावांवर बाद झाला. तसेच भारताच्या गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केली. अर्शदीप सिंग याने २ बळी तर हार्षित राणा याने २ फलंदाज बाद केले. वॉशिंगटन सुंदर याने १ गडी तंबूत माघारी पाठविला. अक्सर पटेल याने २ बळी तर हार्दिंक पांड्या याने २ गडी बाद केले. कुलदीप यादवला १ बळी टिपता आला. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
भारत : शुभमन गिल ११२, रोहित शर्मा १, कोहली ५२, श्रेयस अय्यर ७८, के.एल राहुल ४०, हार्दिक पांड्या १७, अक्सर पटेल १३, वॉशिंगटन सुंदर १४, हार्षित राणा १३, अर्शदीप सिंग २, कुलदीप यादव १ एकूण ५० षटकांत ३५६/१० 
 
इंग्लंड : फिल सॉल्ट  २३, बेन डकेट ३४, तॉम बॅनटन ३८, रूट २४, ब्रुक १९, बटलर ६, लिव्हिंगस्टन ९, गुस अ‍ॅटकिनसन ३८, मार्क वूड ९, साकिब मेहमुद २ एकूण ३४.२ षटकांत २१४/१०

Related Articles