राज्य सरकारच्या कोणत्याही जनहिताच्या योजना बंद नाहीत   

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू झालेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद केली जाणार आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अशा प्रकारे कोणतीही योजना बंद झालेली नाही. रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांनी रविवारीच माझ्याकडे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची अयोध्यावारीची फाईल पाठविली होती. ती मी मंजूर केली असल्याची माहिती सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल देखील अशाच वावड्या उठविण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजना आल्यानंतर आचारसंहिता सुरू झाली. त्यावेळी अनवधानाने काही अर्जांची छाननी राहून गेली असेल. चारचाकी वाहन असणार्‍या, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍यांना छाननीअंती वगळण्यात आले असेल. 

Related Articles