दिल्ली मुख्यमंत्री पदासाठी नड्डा -शहांमध्ये खलबते   

नवी दिल्ली : दिल्लीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी बैठक घेऊन खलबते केली. 
  
निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ? याचे उत्तर मिळालेले नाही. तसेच निवडणुकीपूर्वी पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील जाहीर केलेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर नड्डा आणि शहा यांनी काल बैठकीत चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत परवेश वर्मा, सतीश उपाध्याय, विजयेंद्र गुप्ता, आशिष सूद आणि पवान शर्मा यांची नावे आघाडीवर आहेत. भाजप सर्वसाधरणपणे सार्वजनिक जीवनात फाशा प्रसिद्ध नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवत आले आहे. एका भाजप नेत्याने सांगितले की, पूर्वांचलची पार्श्वभूमी असलेल्या आमदाराचा पदासाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. जसे शीख धर्मीय आमदार किंवा महिला देखील पदासाठी निवडली जाईल. अर्थात सर्व बाबी राजकीय गणिते आणि पक्ष श्रेष्ठ ठरवतील त्यावर अवलंबून असेल. २०२३ मध्ये मध्य प्रदेश आणि राजस्तान आणि गेल्या वर्षी ओडिशातही नव्या चेहर्‍याला मुख्यमंत्री पद दिले होते. मध्य प्रदेशात मोहन यादव, राजस्तानात भजनलाल शर्मा आणि ओडिशात मोहन चरण माजी यांना मुख्यमंत्री पद दिले होते. आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता वाढली आहे. 

Related Articles