आगीत होरपळून महिलेचा मृत्यू   

कोंढवा : एनआयबीएम रस्त्यावरील एका इमारतीतील सदनिकेत आग लागून एका महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना कोेंढवा येथे घडली. परंतू अग्निशमन दलाच्या जवनाने इतर भागात लागलेली आग आटोक्यात आणली.
  
एनआयबीएम रस्त्यावरील सन फ्लॉवर आणि सनश्री सोसायटी आहे. रविवारी दुपारी सोसायटीतील एका सदनिकेत आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सदनिकेतील गृहापयोगी साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. आग भडकल्याने सदनिकेत असलेल्या महिलेला बाहेर पडता आले नाही. आगीत गंभीर होरपळलेल्या महिलेला जवानांनी बाहेर काढले. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. गंभीर होररळलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

Related Articles