जैन जीवन जगण्याची कला अवगत करण्याची संधी   

पुणे : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मन शांती आणि तणावमुक्त जीवन हवे आहे, यासाठी प्रत्येकजण विविध मार्ग शोधत आहेत. परंतु वेळेअभावी प्रत्येकाला वेळ देणे जमत नाही. या पार्श्वभूमीवर जैनम आणि जीविका जैन या बालवक्त्यांचे लाईव्ह सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
 
जैनम आणि जीविका जैन यांच्या सोबत जैन जीवन जगण्याची कला अवगत करण्याची संधी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लाईव्ह सेमिनारच्या माध्यमातून सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. सहभागी होण्यासाठी हीींिीं://क्षुेश्रर्.ूेीपसक्षरळपी.लेा/ या लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागी प्रेक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या ममता जैन यांनी दिली. तीन तासांच्या सेमिनारमध्ये जीवन जगत असताना येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा कसा सामना करावा याचे मार्गदर्शन जैनम आणि जीविका जैन हे बालवक्ते करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या ममता जैन यांनी दिली.

Related Articles