भाजपची सत्ता १५ राज्यांत;तर एनडीएची २१ राज्यांत   

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त करुन तब्बल २७ वर्षानंतर सत्ता प्राप्त केली आहे. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या दिल्लीसह १५ झाली असून भाजपप्रणित लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता २१ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात आहे. 
 
गेल्या वर्षी आठ राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेेश, सिक्किम, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर (केंद्र शासित), हरयाना, महाराष्ट्र आणि झारखंडचा समावेश होता. त्यापैकी पाच राज्यांत भाजप आणि युतीने विजय संपादन केला. त्यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरयाना आणि महाराष्ट्राचा समावेश होता. अपवाद सिक्किमचा होता. तेथे भाजपने एसकेएम पक्षासोबतची युती निवडणुकीपूर्वी तोडली होती. मात्र, केंद्रात एसकेएम पक्षासोबत भाजपची युती कायम आहे. 
 
भाजपची सत्ता असलेली १५ राज्ये
 
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्तान, ओडिशा, आसाम, छत्तीसगढ, हरयाना, दिल्ली, उत्तराखंड, त्रिपुरा, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर.
 
भाजपशी युती असलेल्या राज्यांत सत्ता
 
आंध्र प्रदेश (टीडीपी), बिहार (संयुक्त जनता दल), मेघालय (एनपीपी), नागालँड (एनडीपीपी), सिक्कीम (एसकेएम), पुद्दुचेरी (एआयएनआरसी)

Related Articles