अभिषेक शर्मा दुसरे स्थान   

मुंबई : भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती. पाचव्या टी २० सामन्यामध्ये अभिषेक शर्मा याने  ५४ चेंडूमध्ये ७ चौकर आणि १३ षटकार मारले होते.
 
अभिषेक शर्मा याने १३५ धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले. आयसीसी टी-२० क्रमवारीमध्ये अभिषेक शर्मा याने ३८ स्थानांची झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले. अभिषेक शर्मा यापूर्वी आयसीसी टी २० क्रमवारीमध्ये ४० व्या स्थानावर होता. इंग्लंड विरुद्ध त्याने आक्रमक खेळी करत गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेक शर्मा याने ८२९ अंकांची रेटिंग मिळवली होती.
 
ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ८५५ इतके आहे. भारताचा युवा खेळाडू तिलक वर्मा तिसर्‍या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ८०३ आहे.अभिषेक शर्माच्या दमदार खेळीमुळे फिल्ट सॉल्ट चौथ्या स्थानावर गेला आहे. त्याच्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे.

Related Articles