राम मंदिराची पहिली वीट रचणारे चौपाल यांचे निधन   

अयोध्या : येथील राम मंदिराची पहिली वीट रचणारे आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते कामेश्वर चौपाल यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या शिलान्यास सोहळ्यात राम मंदिराची पहिली वीट रचण्याचा मान त्यांना मिळाला होता. 
 
दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालविल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रने दिली. मंदिर ट्रस्टचे सदस्य असलेले चौपाल गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. ते बिहारची राजधानी पाटणाचे रहिवासी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील त्यांचे कौतुक पहिले कार सेवक असा केला होता. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील दु:ख व्यक्त केले असून मोठे रामभक्त असा उल्लेख केला आहे. विश्व हिंदू परिषदेने एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चौपाल यांच्या निधनामुळे अतिशय दु:ख झाले. तसेच धक्का देखील बसला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि चौपाल कुटुंबीयांना देखील दु:ख पचविण्याचे सामर्थ्य मिळो. 

Related Articles