राज्यातील तपमानात आणखी वाढ होणार   

पुणे : पुढील चार दिवसांत राज्यातील बहुतांश भागातील कमाल आणि किमान तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत राज्यातील तपमानात वाढ झाल्याने ऊन्हाचा पारा वाढला आहे. आणखी ३ ते ४ अंशाने तपमानात वाढ होणार असल्याने ऊन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. 
 
मागील २४ तासात गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. आज (शुक्रवारी) हवामान कोरडेच असणार आहे. सद्य:स्थितीत दिवसाच्या तुलनेत रात्रीचे तपमान कमी आहे. त्यामुळे रात्री आठनंतर हवेत हलका गारवा जाणवत आहे. हा गारवा पहाटेपर्यंत टिकून राहात आहे. सकाळी दहापासून मात्र ऊन वाढण्यास सुरूवात होत आहे. त्यानंतर दुपारी चारपर्यंत ऊन कायम रहात आहे. आहे त्या तपमानात आणखी वाढ होणार असल्याने उकाडाही वाढणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात नागरिकांना दुपारी घराबाहेर पडताना छत्री, टोपी, रूमालाचा वापर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे घरात तसेच कार्यालयातील नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी फॅन, कुलर, एसीचा वापर करावा लागणार आहे. येत्या काळात कमाल आणि किमान तपमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश नीरभ्र असणार आहे. दिवसभर ऊन कायम असणार आहे. उकाड्यातही वाढ होणार आहे. रात्रीच्या तपमानात मात्र घट होणार असल्याने चार दिवस पहाटे हवेत गारवा राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच पहाटे काही भागात हलके धुके पडणार आहेत. 
 
शहरातील किमान तपमान
 
ठिकाण                   तपमान
एनडीए १४.१ अंश 
शिवाजीनगर १४.७ अंश
पाषाण                     १५ अंश
लोहगाव               १७.६ अंश
मगरपट्टा              २१.२ अंश

Related Articles