अमेरिकेतून १०४ भारतीय मायदेशी   

अमृतसर :पंजाबच्या अमृतसर येथील श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेच्या लष्कराचे एक विमान १०४ भारतीयांसह उतरले.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत अधिकृत कागदपत्रे नसलेल्या भारतीयांना परत पाठविण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अमेरिकेच्या लष्कराचे सी १७ विमान अमृतसर येथे उतरले. त्यामध्ये पंजाबचे ३०, हरयाना आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी तीन आणि चंडीगढमधील दोघांचा समावेश आहे. पंजाबमधून अनेकांनी बेकायदा अमेरिकेत प्रवेश केला आहे. त्यासाठी त्यांनी लाखो रुपये मोजले होते. आता त्यांच्यासह अन्य भारतीयांना परत पाठवले आहे. दरम्यान, विमानातून २०५ भारतीय येणार असल्याचे सांगण्यात आले होते. अमेरिकेने पहिल्या टप्प्यात १०४ भारतीयांची रवानगी केली आहे.

Related Articles