अधिवासात आणखी पाच चित्ते सोडले   

भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच चित्त्यांना अधिवासात सोडले जाणार आहे. त्यामुळे उद्यानात मुक्त वावर करणार्‍या चित्त्यांची संख्या आता सात आहे. या संदर्भातील माहिती उद्यानाच्या वतीने बुधवारी देण्यात आली.
 
उद्यानात एकूण २६ चित्ते असून त्यापैकी सात आता जंगली अधिवासात मुक्तपणे फिरू लागले आहेत. मुुख्यमंत्री मोहन यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दुपारी धिरा आणि आशा चित्तिणीला अधिवासात सोडले  आशासोबत तिचे तीन बछडे देखील होते. या प्रसंगी यादव यांनी अधिकार्‍यासमवेत उद्यानाची पाहणी केली. चित्यांचे संगोपन व्यवस्थित होत आहे की नाही ? याचा आढावा आणि माहिती अधिकार्‍यांकडून घेतली. 
 
मध्य प्रदेशात चित्त्यांची संख्या वाढत चालली आहे, ही बाब समाधानाची आहे. वीरा चित्तिणीने दोन बछड्यांना जन्म नुकताच दिला आहे. त्यामुळे २६ चित्ते आणि १४ बछडे उद्यानात आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वायू आणि अग्नि यांना जंगली अधिवासात सोडले होेते.  काल पाच चित्ते अधिवासात सोडले आहेत. दरम्यान, १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नामेबियातून आणलेले आठ चित्ते उद्यानात प्रथम सोडले होते. त्यामध्ये पाच माद्या आणि तीन नरांचा समावेश होता.

Related Articles