जो रूट याला इंग्लंड संघात स्थान   

नागपूर : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसाच्या  मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेचा पहिला सामना नागपूरला रंगणार असून त्यासाठी इंग्लंड आपली ’प्लेइंग ११’ जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे सामन्याच्या आदल्या दिवशी जाहीर केलेल्या संघात इंग्लंडने एका खास खेळाडूला स्थान दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०२३ नंतर तब्बल ४५२ दिवसांनी त्याला इंग्लंडच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे. तो स्टार खेळाडू म्हणजे इंग्लंडचा तुफान फॉर्मात असलेला फलंदाज जो रूट.
  
जो रूटने शेवटचा एकदिवसाचा सामना २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर आता तो उद्या खेळताना दिसणार आहे.इंग्लंडच्या वनडे संघात टी-२० संघापेक्षा फारसा बदल करण्यात आलेला नाही. बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. हॅरी ब्रुक आणि लियम लिव्हिंगस्टन यांचीही संघात निवड झाली आहे. जो रूट तिसर्‍या क्रमांकावर खेळताना दिसेल. याशिवाय, जेकब बेथेल देखील संघाचा भाग असणार आहे. तर गोलंदाजीत ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद हे तिघे वेगवान गोलंदाज संघात आहेत. त्यासह अनुभवी फिरकीपटू आदिल रशीदला संघात फिरकीची जबाबदारी देण्यात आली आहे.इंग्लंडचा संघ- बेन डकेट, फिल सॉल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

Related Articles