E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शेतकर्यांना १६ हजार मेगावॅट वीज
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
पुणे
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसीत भारताचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या उद्दिष्टाकडे आपण पुढील वाटचाल करीत चाललो आहे. कौशल्य विकास व उद्योजकता यावर अधिक भर दिला जात आहे. देशाच्या आर्थिक जडणघडणीत शेतकर्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. सध्या शेतकर्यांना अर्ध दिवसच वीज मिळत आहे. यापुढे इको सिस्टिमचा वापर करून सोलरद्वारे अधिक प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल. त्यामुळे पुढील वर्षापासून शेतकर्यांना पुर्ण दिवस १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध करून देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
डिपेक्स २०२५, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट, कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, सी. ओ. इ. पी. टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित ’व्हिजन महाराष्ट्र २०४७’ या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री पंक भोयर, अभाविप राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्र सिंग सोलंकी, प्रमोद चौधरी, अर्जुन वाडकर, भरत अमळकर, प्रमोद कुलकर्णी, स्वागत समिती अध्यक्ष प्रकश धोका, सचिव प्रसेंजित फडणवीस, अभाविपचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये भारत युवा देश होईल, असे सांगितले होते. तरूणांची ही शक्तीच देशाला विकासाच्या वाटचालीकडे नेत आहे. डिफेन्स क्षेत्रात अलीकडे आपली चांगली प्रगती झाली आहे. या विभागाने ३० ते ३५ हजार कोटींचे नवीन उत्पादन विकसीत केले आहे. सोलर इंडस्ट्रीजमध्ये देखील मोठी चांगली वाटचाल सुरू आहे. देशात ’वेपन’ तयार केले गेले आहे. त्यामुळे भारताकडे आपण स्वयंपूर्ण नजरेने पाहत आहो. सध्या वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाची अधिक हाणी होत चालली आहे. त्यामुळे नेट झीरोकडे कसे जाऊ, याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. तसेच, कचर्यापासून आपण वीजनिर्मिती देखील करीत आहे. त्यामुळे नागरिकांना वीजेसह रोजगाराची संधी सुध्दा उपलब्ध होत आहे. नवीन उद्योजक निर्मितीच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे.
याबाबत पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन ते तीन वर्षात स्टार्टअपमध्ये बदल पहावयास मिळाला. आता चार ते पाच वर्षात स्टार्टअपमध्ये चांगलाच आमुलाग्र बदल झाला आहे. स्टार्टअप कॅपिटल इको सिस्टिमध्ये तरूण पुढे जात आहेत. सध्या सगळीकडे टेक्नोलॉजी स्टार्टअप पाहवयास मिळत आहे. आपण इन्होवेशन स्वीकारले म्हणूनच नवीन उद्योजकांना चालना मिळत आहे. डिपेक्स विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन उद्योजकता पेटेंट तयार केले आहे. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. तरूणाने उद्योग क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती करावी. सरकार त्यांच्या पाठींशी कायम सोबत असेल, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले. आभार प्रदर्शन अथर्व कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन संकल्प पळदेसाई यांनी केले.
Related
Articles
आयपीएल सामन्यांमधील फटाक्यांची आतषबाजी,चीअरलीडर्सचे नृत्य रद्द
24 Apr 2025
महापालिकेच्या ’आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीस राज्य सरकारचे द्वितीय पारितोषिक
22 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
दिल्लीतील सुरक्षेत वाढ
24 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
आयपीएल सामन्यांमधील फटाक्यांची आतषबाजी,चीअरलीडर्सचे नृत्य रद्द
24 Apr 2025
महापालिकेच्या ’आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीस राज्य सरकारचे द्वितीय पारितोषिक
22 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
दिल्लीतील सुरक्षेत वाढ
24 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
आयपीएल सामन्यांमधील फटाक्यांची आतषबाजी,चीअरलीडर्सचे नृत्य रद्द
24 Apr 2025
महापालिकेच्या ’आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीस राज्य सरकारचे द्वितीय पारितोषिक
22 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
दिल्लीतील सुरक्षेत वाढ
24 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
आयपीएल सामन्यांमधील फटाक्यांची आतषबाजी,चीअरलीडर्सचे नृत्य रद्द
24 Apr 2025
महापालिकेच्या ’आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीस राज्य सरकारचे द्वितीय पारितोषिक
22 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
दिल्लीतील सुरक्षेत वाढ
24 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
3
राज-उद्धव एकत्र येणार?
4
कांगोमध्ये तेलवाहू बोटीवर आगीचा भडका; १४३ बळी
5
बीजेडीच्या अध्यक्षपदी पुन्हा नवीन पटनायक सलग नवव्यांदा निवड
6
कॅनडात भारतीय विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू