E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
तक्रार देण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्यांवर गुन्हा
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
पुणे
: बुलेट आणि मोटार विक्री करणार्या कंपन्याविरोधात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.विजय म्हस्के आणि अविनाश रमेश रोकडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी, एका वाहन विक्री करणार्या कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी तक्रार दिली.
तक्रारदार यांच्या मावस भावाची वाहन विक्री करणारी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे मोटार विक्री करण्याचे दालन वारजे भागात आहे. या दालनातील सर्व जबाबदारी पाहण्याचे काम त्यांच्याकडे आहे. आरोपी विजय म्हस्के २०१७ मध्ये संबंधित कंपनीत कामाला होता. सहा महिने काम केल्यानंतर त्याने काम सोडून दिले होते. त्यानंतर म्हस्केने ११ मार्च रोजी व्यवस्थापाकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कंपनीच्या कामासंदर्भात भेटायचे आहे, असे सांगून त्याने त्यांना मार्केट यार्ड भागातील एका हॉटेलमध्ये बोलाविले.
वारजे भागातील कंपनीच्या सर्व्हिस सेंटर पर्यावरणविषयक निकषांची पूर्तता केली नाही. कंपनीकडे याबाबतचे प्रमाणपत्रही नाही. याबाबत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देण्यात येणार आहे, तसेच याबाबत देण्यात आलेली नोटीस त्याने व्यवस्थापकाला दाखविली. याप्रकरणाचा पाठपुरावा मी करणार आहे, असे म्हस्केने त्यांना सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकाने म्हस्केला समजावून सांगितले. ‘तू कंपनीत काम केले आहे. विनाकारण त्रास देणे योग्य नाही,’ असे त्यांनी म्हस्केला सांगितले. त्यानंतर ‘मी नोटीस मागे घेतो, त्यासाठी काही तरी द्यावे लागेल’, असे म्हस्केने त्यांना सांगितले.
म्हस्केने त्यांना पुन्हा भेटायला बोलावले. ’याप्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. मंत्रालयात तक्रार देऊन तुमची कंपनी बंद पाडतो. पाठपुरावा न करण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील,’ असे त्याने सांगितले. म्हस्केच्या सांगण्यावरुन अविनाश रोकडेने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नोटीस मागे घ्यायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. म्हस्के आणि रोकडे यांच्या धमक्यांमुळे तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज
23 Apr 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक-ई रिक्षाचे वाटप
21 Apr 2025
चौकशीसाठी पाकिस्तान तयार
27 Apr 2025
मुंबईला जाण्याअगोदर बदलीचा आदेश येईल
26 Apr 2025
राज्यात मराठीलाच प्राधान्य : फडणवीस
21 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज
23 Apr 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक-ई रिक्षाचे वाटप
21 Apr 2025
चौकशीसाठी पाकिस्तान तयार
27 Apr 2025
मुंबईला जाण्याअगोदर बदलीचा आदेश येईल
26 Apr 2025
राज्यात मराठीलाच प्राधान्य : फडणवीस
21 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज
23 Apr 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक-ई रिक्षाचे वाटप
21 Apr 2025
चौकशीसाठी पाकिस्तान तयार
27 Apr 2025
मुंबईला जाण्याअगोदर बदलीचा आदेश येईल
26 Apr 2025
राज्यात मराठीलाच प्राधान्य : फडणवीस
21 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज
23 Apr 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक-ई रिक्षाचे वाटप
21 Apr 2025
चौकशीसाठी पाकिस्तान तयार
27 Apr 2025
मुंबईला जाण्याअगोदर बदलीचा आदेश येईल
26 Apr 2025
राज्यात मराठीलाच प्राधान्य : फडणवीस
21 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
2
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
3
बिहारसाठी तयारी (अग्रलेख)
4
वैचारिक जागृतीचे व्यासपीठ
5
‘ज्येष्ठांप्रमाणे तरुणांमध्ये हास्य चळवळ रूजावी’
6
महसुली नोंदीतील बदलामुळे देवस्थान जमिनींची विक्री बेकायदा