E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चेटीचंड महोत्सवातून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
पुणे
: ’आयो लाल झुलेलाल’ या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती... झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन... सिंधी गीतांची बहारदार मैफल, कलात्मक नृत्याविष्कार, चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद, साई झुलेलाल यांचे ’लाल झुले लाल झुले लाल झुलेलाल’ हे अखंड भजन अशा वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.
सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७५ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव आयोजिला होता. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी भाषकांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली.मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी, प्रियांशी कर्वाणी, रीतिका सुंदरानी, अमान सुंदरानी यांच्यासह १७ गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिम्फनी बँड, सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्टने उपस्थितांची मने जिंकली. जनरेशन नेक्स्ट डान्स अॅकॅडमीतर्फे आकर्षक नृत्यकलेचे सादरीकरण झाले. पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील चार-साडेचार हजार सिंधी भाषक या महोत्सवात सहभागी झाले.
मिलेनियम सेमीकंडक्टर्स इंडियाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी यांच्या हस्ते साई झुलेलाल यांची महाआरती झाली. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी, संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, पुरुषोत्तम पर्यानी, सचिन तलरेजा, राजेंद्र फेरवानी, निलेश फेरवानी, देवेंद्र चावला, जय पिंजानी आदी उपस्थित होते.अशोक वासवानी म्हणाले, सिंधी संस्कृती विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३८ वर्ष कार्यरत आहे.
Related
Articles
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरपरीक्षेचा उल्लेख राहणार नाही : यूजीसी
28 Apr 2025
थायलंड पोलिसांचे विमान कोसळले; ६ ठार
26 Apr 2025
गुजरातचे राजस्तानसमोर २१० धावांचे आव्हान
29 Apr 2025
एफ-१५ विमानांच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात
23 Apr 2025
‘काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करण्यासाठीच पहलगामचा हल्ला’
28 Apr 2025
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
2
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
3
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)