E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
पुणे
: शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यास प्रशासनाला यश येत आहे. पारंपारिक दहन कुंडासाठी आधुनिक यंत्रणांच्या वापरासोबतच विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनी पर्यायांच्या पुढे जात नागरिकांच्या सहकार्याने येथील अंत्यसंस्कारांची संख्या २५ टक्क्यांनी कमी करण्यातही प्रशासनाला मागील तीन चार महिन्यांत यश आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शहरातील मृतांपैकी जवळपास साठ ते सत्तर टक्क्यांवर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होतात. येथे तीन विद्युत दाहिनी आणि एक गॅसदाहिनी असून पारंपारिक दहनासाठी २५ हून अधिक कुंड आहेत. शहराच्या मध्यवर्ती असल्याने मध्यवर्ती पेठांसोबतच कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, सिंहगड रस्ता परिसरासह शहराच्या विविध भागांतील मृतांवर येथेच अंत्यसंस्कार होतात. पारंपारिकच नव्हे तर विद्युत दाहिन्यांमध्ये दहनामुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने अधुनिक यंत्रणा उभारली आहे. परंतू अंत्यसंस्कारांची संख्या अधिक असल्याने परिसरातील नागरिकांकडून प्रदूषणाच्या अद्यापही तक्रारी येत असल्याने प्रशासनाने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, की शहरातील पन्नास टक्के मृतांवर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होतात. शहरातील महापालिकेच्या पाच झोनमध्ये २९ ठिकाणी स्मशानभूमी आहेत. परंतू मृतांच्या कुटुंबियांचा वैकुंठमध्येच अंत्यसंस्काराचा कल अधिक पाहायला मिळाला.
ज्या भागात राहातात, त्याच परिसरातील स्मशानभूमीमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यू पास केंद्रांकडून पास देताना कुटुंबियांना विनंती करण्यास सुरूवात करण्यात आली. नागरिकांच्या सहकार्यामुळे याचे सकारात्मक परिणाम दिसून येउ लागले आहेत. मागील तीन महिन्यांत वैकुंठमध्ये पुर्वी होणार्या अंत्यसंस्कारांची संख्या साधारण २५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. पुढील काळात शहरातील अन्य स्मशानभूमींमध्ये गॅस दाहिन्यांसह अधुनिक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न राहतील.
वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मागील सहा महिन्यात झालेले अंत्यसंस्कार
ऑक्टोबर २०२४ - ८२९
नोव्हेंबर २०२४ - ७५०
डिसेंबर २०२४ - ८०५
प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर
जानेवारी २०२५ - ८१७
फेब्रुवारी २०२५ - ६१५
मार्च २०२५ - ७१८ आल्या नाहीत.
Related
Articles
यूपीएससीमध्ये अर्चित डोंगरे देशातून तिसरा तर महाराष्ट्रातून पहिला
22 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
तरूणाचा नीरा कालव्यामध्ये बुडून मृत्यू
22 Apr 2025
धर्मादाय रूग्णालयांच्या तपासणीसाठी विशेष पथक
24 Apr 2025
प्रत्येकाला जगवणे ही समाजाची जबाबदारी : मुख्यमंत्री
21 Apr 2025
शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
25 Apr 2025
यूपीएससीमध्ये अर्चित डोंगरे देशातून तिसरा तर महाराष्ट्रातून पहिला
22 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
तरूणाचा नीरा कालव्यामध्ये बुडून मृत्यू
22 Apr 2025
धर्मादाय रूग्णालयांच्या तपासणीसाठी विशेष पथक
24 Apr 2025
प्रत्येकाला जगवणे ही समाजाची जबाबदारी : मुख्यमंत्री
21 Apr 2025
शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
25 Apr 2025
यूपीएससीमध्ये अर्चित डोंगरे देशातून तिसरा तर महाराष्ट्रातून पहिला
22 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
तरूणाचा नीरा कालव्यामध्ये बुडून मृत्यू
22 Apr 2025
धर्मादाय रूग्णालयांच्या तपासणीसाठी विशेष पथक
24 Apr 2025
प्रत्येकाला जगवणे ही समाजाची जबाबदारी : मुख्यमंत्री
21 Apr 2025
शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
25 Apr 2025
यूपीएससीमध्ये अर्चित डोंगरे देशातून तिसरा तर महाराष्ट्रातून पहिला
22 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
तरूणाचा नीरा कालव्यामध्ये बुडून मृत्यू
22 Apr 2025
धर्मादाय रूग्णालयांच्या तपासणीसाठी विशेष पथक
24 Apr 2025
प्रत्येकाला जगवणे ही समाजाची जबाबदारी : मुख्यमंत्री
21 Apr 2025
शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
25 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
2
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
3
बिहारसाठी तयारी (अग्रलेख)
4
वैचारिक जागृतीचे व्यासपीठ
5
‘ज्येष्ठांप्रमाणे तरुणांमध्ये हास्य चळवळ रूजावी’
6
महसुली नोंदीतील बदलामुळे देवस्थान जमिनींची विक्री बेकायदा