E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
रांजणगाव
, (वार्ताहर) : एका व्यावसायिकाला व्यवसाय वाढीसाठी पाच कोटी कर्ज देतो असे सांगून इंडोस्टार हाउसिंग फायनान्स या कंपनीच्या मॅनेजर व इतर दोन जणांनी लाखो रुपये कमिशन घेऊन कर्ज न देता फसवणूक केल्यामुळे व्यावसायिकाने आपले जीवन संपविले.
संग्राम आबुराव सातव (वय ४६, रा. शेळके मळा, रांजणगाव गणपती ता. शिरुर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी जनाबाई संग्राम सातव (रा. शेळके मळा रांजणगाव गणपती) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र यशवंत पाटील (रा.थेरगाव, पुणे), विशाल घाटगे (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) आणि मच्छिंद्र पोपट झंजाड (रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर) या तिघांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील सातव यांची रबर कंपनी असल्याने त्यांना कंपनी वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांना इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर पाटील, घाटगे व झंजाड यांनी सातव यांना कर्ज मिळवून देण्यासाठी काही पैशांची मागणी केली. दरम्यान सातव यांनी त्यांच्या घरावर कर्ज काढून इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर पाटील यांना पाच कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी चाळीस लाख रुपये, घाटगे यांस पन्नास लाख कर्ज मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपये, तसेच झंजाड नावाच्या व्यक्तीस कर्ज मिळवून देण्यासाठी तीन लाख रुपये दिले. मात्र या फायनान्स मॅनेजरसह इतर दोघांनी सातव यांचे फोनच उचलत नसल्याने आणि कर्ज देखील मंजूर करत नसल्याने सातव यांनी मानसिक तणावात जाऊन राजणगाव लांडेवस्ती येथील कंपनीच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. यातील आरोपी पाटील व झंजाड यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहे.
Related
Articles
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
21 Apr 2025
भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
26 Apr 2025
घुसखोरीचा डाव उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
24 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
21 Apr 2025
भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
26 Apr 2025
घुसखोरीचा डाव उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
24 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
21 Apr 2025
भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
26 Apr 2025
घुसखोरीचा डाव उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
24 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
21 Apr 2025
भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
26 Apr 2025
घुसखोरीचा डाव उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
24 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
2
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
3
बिहारसाठी तयारी (अग्रलेख)
4
वैचारिक जागृतीचे व्यासपीठ
5
‘ज्येष्ठांप्रमाणे तरुणांमध्ये हास्य चळवळ रूजावी’
6
महसुली नोंदीतील बदलामुळे देवस्थान जमिनींची विक्री बेकायदा