E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
जवानाच्या घरातून दागिने लांबविणार्यास अटक
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
पुणे
: लष्करातील हवालदाराच्या घरातून २१ तोळ्यांचे दागिने चोरून पसार झालेल्या जवानाला वानवडी पोलिसांनी सातार्यातून अटक केली. अटक करण्यात आलेला जवान हा लष्करात होता. मात्र, सेवा पूर्ण न करता तो लष्करातून पळून गेला होता. अमरजीत विनोदकुमार शर्मा (वय-३०, बघेल, ता. बदसर, जि. हमिरपूर, हिमाचल प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वानवडी परिसरात राहणारे लष्करातील जवान के. एम. वादीवेल्लू (वय-३५) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. आरोपीने दिल्ली, तसेच हिमाचल प्रदेशात विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. तक्रारदार यांची पत्नी कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या.
त्यावेळी आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून कपाटातील २१ तोळे सोन्याचे दागिने लांबवले होते. चोरी झाल्यानंतर हवालदार वादीवेल्लू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. वानवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर, तांत्रिक तपासावरून शर्मा याचा शोध घेऊन त्याला सातारा परिसरातून अटक केली. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वानवडी, लष्कर, गोळीबार मैदान चौक, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, विमाननगर, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही ५० ठिकाणचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरण आणि तांत्रिक तपासावरून शर्माने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. तो उत्तर प्रदेश, अंबाला, जोधपूर, हिमाचल प्रदेश, दिल्लीत वास्तव्यास होता. त्यानंतर तो बंगळुरूत गेल्याची माहिती मिळाली. बंगळुरूतून तो बेळगावकडे बसमधून रवाना झाला. त्यानंतर पोलिसांचे पथक बेळगावला पोहोचले. बेळगावमधून तो बसने सातार्याकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सातार्याजवळ त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात त्याला हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Related
Articles
दारूगोळा कारखान्यातून चोरली २२ काडतुसे
20 Apr 2025
लोकमान्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीला कर्मयोगाचे तत्वज्ञान : डॉ. दीक्षित
23 Apr 2025
‘उजनी बॅकवॉटरचा राखीव साठा पावसाळ्यापर्यंत ठेवा’
22 Apr 2025
मांजरी बुद्रुक नागरिकांची पाण्यासाठी वणवण
23 Apr 2025
उत्तर प्रदेशात खांदेपालट ३३ प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्या
23 Apr 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे राजकीय कारस्थान : कन्हैया कुमार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
सुखधारांची प्रतीक्षा
3
भाजपची तामिळ खेळी
4
वाहन उद्योग वेगात
5
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
6
राज-उद्धव एकत्र येणार?