E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जैस्वालने घेतला मुंबई संघ सोडण्याचा निर्णय
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
मुंबई
: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू यशस्वी जैस्वाल याला देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळायचे नाही, या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागितले आहे. यशस्वी जैस्वालने एमसीएला एक ईमेल लिहून पुढील हंगामासाठी मुंबईहून गोव्यात त्यांचा क्रिकेट राज्य संघ बदलण्यासाठी एनओसी मागितली आहे. यशस्वी जैस्वालने अचानक घेतलेल्या निर्णयावरुन क्रिकेटविश्वात विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने यशस्वी जैस्वालवर निशाणा साधला होता. बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोणतेही कारण न देता देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले होते. यानंतर यशस्वी जैस्वाल मुंबई क्रिकेट संघाकडून खेळला. परंतु जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात फक्त ४ आणि दुसर्या डावात २६ धावा केल्या होत्या. तसेच मुंबईने हा सामना ५ बळीने गमावला.अजिंक्य रहाणे हा मुंबईच्या प्रथम श्रेणी संघाचा कर्णधार आहे. तसेच यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यात संबंध काही चांगले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच एका सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वालने अजिंक्य रहाणेच्या किट बँगला लाथ मारली होती, असंही बोललं जात आहे. २०२२ मध्ये अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला एका सामन्यादरम्यान बाहेर पाठवले होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी यशस्वी आणि साऊथ झोनचा फलंदाज रवी तेजा यांच्यात वाद झाला. पहिल्या वेळी ५०व्या षटकात हा वाद झाला. पण रहाणे आणि पंचांनी तो शांत केला. मात्र ५७व्या षटकात पुन्हा एकदा वाद वाढला. त्यानंतर रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आणि यशस्वीला मैदानाबाहेर पाठवले. यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात खेळत आहेत. अजिंक्य रहाणे हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. तर यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.
यशस्वी जैस्वालने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३७१२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या २६५ आहे. यशस्वी जैस्वालने प्रथम श्रेणी सामन्यात १३ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत. यशस्वी जैस्वालने लिस्ट ए मध्ये ३३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १५२६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल सध्या भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. यशस्वी जैस्वालने १९ कसोटी, १ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. यशस्वी जैस्वालने कसोटीत ४ शतके आणि टी-२० मध्ये १ शतक झळकावले आहे.
Related
Articles
घरोघरी शोध मोहीम
26 Apr 2025
उन्हाळ्यात डोळ्यांच्या संसर्गात वाढ; काळजी घेण्याचे आवाहन
24 Apr 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे राजकीय कारस्थान : कन्हैया कुमार
22 Apr 2025
अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांचे बक्षीस जाहीर
24 Apr 2025
‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
24 Apr 2025
पाकिस्तानचा शेअर बाजार भारताच्या कारवाईनंतर कोसळला
25 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
सुखधारांची प्रतीक्षा
3
भाजपची तामिळ खेळी
4
वाहन उद्योग वेगात
5
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
6
राज-उद्धव एकत्र येणार?