E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
२५ हजार शिक्षकांची भरती रद्द करण्याचा निर्णय कायम
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा धक्का दिली. पश्चिम बंगालमधील २५,७५३ शिक्षक आणि इतर कर्मचार्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली. तसेच, संपूर्ण निवड अवैध आणि कलंकित असल्याचे मत न्यायालयाने यावेळी नोंदविले.
सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने २२ एप्रिल २०२४ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेला निकाल कायम ठेवला. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही वैध कारण किंवा आधार आम्हाला आढळला नाही, असेही स्पष्ट केले. यासोबतच, तीन महिन्यांत नव्याने निवड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
२०१६ मध्ये राज्य संचालित आणि राज्य अनुदानित शाळांसाठी २५,७५३ शिक्षक आणि इतर कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर हेराफेरी आणि फसवणूक झाली होती. याविरोधात १२५ अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक आणि अन्य कर्मचार्यांची नियुक्ती अवैध ठरवली असली तरी त्यांनी वेतन आणि मानधन परत करण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. काही अपंग कर्मचार्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून यातून वगळण्यात आले आहे. ते नोकरीत कायम राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.या प्रकरणावरील सुनावणी १९ डिसेंबर रोजी सुरू झाली होती. तर, १० फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.या प्रकरणात जुलै २०२२ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या अनेक अधिकार्यांना अटक करण्यात आली होती.कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयास ममता बॅनर्जी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
11 Apr 2025
कॅलिफोर्नियाला भूकंपाचा धक्का
15 Apr 2025
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
13 Apr 2025
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
09 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
लखनऊचा अवघ्या ४ धावांनी विजय
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Apr 2025
कॅलिफोर्नियाला भूकंपाचा धक्का
15 Apr 2025
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
13 Apr 2025
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
09 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
लखनऊचा अवघ्या ४ धावांनी विजय
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Apr 2025
कॅलिफोर्नियाला भूकंपाचा धक्का
15 Apr 2025
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
13 Apr 2025
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
09 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
लखनऊचा अवघ्या ४ धावांनी विजय
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Apr 2025
कॅलिफोर्नियाला भूकंपाचा धक्का
15 Apr 2025
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
13 Apr 2025
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
09 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
लखनऊचा अवघ्या ४ धावांनी विजय
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
5
दूरसंचार सेवा महागणार
6
अनर्थाला निमंत्रण (अग्रलेख)