E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एटीएजीएस तोफांना मोठी मागणी : बाबा कल्याणी
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
पुणे : भारत फोर्ज कंपनीकडून अॅडव्हॉन्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) तोफांचा पुरवठा संरक्षण मंत्रालयाला केला जाणार आहे. याचबरोबर युरोपीय देशांतूनही एटीएजीएस तोफांना मोठी मागणी वाढत आहे, अशी माहिती भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी दिली.
भारत फोर्जकडुन जेजुरी येथील नवीन प्रकल्पाची माहिती तसेच अॅडव्हॉन्सड टोव्ह आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) बाबत झालेल्या कराराबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी तसेच भारत फोर्जचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कल्याणी म्हणाले, आम्ही भारतीय लष्कराला तोफांचा पुरवठा करण्याच्या आधीपासून युरोपीय देशांना तोफांची निर्यात करीत आहोत. आम्ही गेल्या वर्षी १०० तोफांची निर्यात केली आहे. त्यात ९० एटीएजीएस तोफांचा समावेश आहे. युरोपीय देशांतून या तोफांना मागणी वाढत आहे. अमेरिका, फ्रान्ससारख्या आघाडीच्या संरक्षण उत्पादन देशांना या तोफांचा पुरवठा केला जाणार आहे. जागतिक पातळीवर आमच्या तोफांची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. सध्याच्या भूराजकीय स्थितीचा विचार करता युद्धात तोफांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर हे प्रकर्षाने समोर आले आहे.
भारतीय लष्कराकडून जुन्या तोफांच्या जागी नवीन तोफा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात तोफांना मोठी मागणी असेल. एटीएजीएस तोफांचा पल्ला ४८ किलोमीटर आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था आणि शस्त्रास्त्र संशोधन व विकास संस्थांनी या तोफा विकसित केल्या आहेत. या तोफांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. एकदा हल्ला केल्यानंतर त्या तातडीने त्यांची जागा बदलता येते. त्यामुळे शत्रूला या तोफा नष्ट करणे शक्य होत नाही, असेही कल्याणी यांनी स्पष्ट केले.
जेजुरीत नवीन उत्पादन प्रकल्प
भारत फोर्जकडून संरक्षण उत्पादन क्षमतांचा विस्तार केला जात आहे. यासाठी कंपनीने जेजुरीत नवीन संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प ३ लाख चौरस फुटांवर विस्तारलेला आहे. ही जागतिक दर्जाची उत्पादन सुविधा असून, त्यात स्वदेशी बनावटीच्या तोफांची निर्मिती केली जाईल.
Related
Articles
अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र
08 Apr 2025
कर्णधार रिषभ पंत,दिग्वेश दोघांनाही दंड
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार
07 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
रूग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले
08 Apr 2025
अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र
08 Apr 2025
कर्णधार रिषभ पंत,दिग्वेश दोघांनाही दंड
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार
07 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
रूग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले
08 Apr 2025
अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र
08 Apr 2025
कर्णधार रिषभ पंत,दिग्वेश दोघांनाही दंड
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार
07 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
रूग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले
08 Apr 2025
अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र
08 Apr 2025
कर्णधार रिषभ पंत,दिग्वेश दोघांनाही दंड
09 Apr 2025
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
07 Apr 2025
पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार
07 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
रूग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले
08 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज