E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध ८० धावांनी विजय
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
कोलकाता : आयपीएलच्या १८ व्या हंगामात गुरुवारी झालेल्या सनराझर्स हैदराबादविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकात्याच्या संघाने ८० धावांनी विजय मिळविला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याच्या संघाने २० षटकांत २०० धावा केल्या यावेळी ६ फलंदाज बाद झाले.
कोलकात्याचा मधल्या फळीतील युवा फलंदाज अंगकृष्ण रघुवंशी याने ३२ चेंडूत ५० धावा करत शानदार अर्धशतक केले. त्याला साथ देताना व्यंकटेश अय्यर याने ६० धावा करत दुसरे अर्धशतक साकारले.या कामगिरीमुळे कोलमडलेली कोलकात्याची फलंदाजी सावरली गेली. मात्र त्याआधी कोलकात्याचे सलामीवीर डी कॉक हा १ धावेवर बाद झाला. कमिन्स याने शानदार चेंडू टाकत झिशान अन्सारी याच्याकडे झेलबाद केले. तर त्याच्याबरोबर दुसर्या क्रमांकावर आलेला नार्ने हा ७ धावांवर बाद झाला. महमद शमी याने चकविणारा चेंडू टाकत क्लासेनकडे त्याला झेलबाद केले.
कर्णधार अजिंक्य रहाणे याने ३८ धावा केल्या. रहाणे याला झिशान अन्सारी याने जबरदस्त चेंडू टाकत क्लासेनकडे झेलबाद केले. रिंकू सिंग याने नाबाद ३२ धावा केल्या. तर रसेल हा १ धावेवर धावबाद झाला. ११ अवांतर धावा संघाला मिळाल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांनी देखील शानदार गोलंदाजी केली. यावेळी वैभव अरोरा याने ३ फलंदाज बाद केले. वरूण चक्रवर्ती याने देखील ३ फलंदाज बाद केले. हर्षित राणा याने १ गडी बाद केला. तर रसेल याने २ फलंदाज बाद झाले. सुनिल नार्ने याने १ बळी टिपला.
त्यानंतर कोलकात्याने दिलेले २०१ धावांचे आव्हान पेलण्यासाठी हैदराबादचा संघ मैदानात उतरला हैदराबादच्या फलंदाजांनी मात्र म्हणावी तेवढी चांगली कामगिरी केली नाही. हैदराबादचा संघ १६.४ षटकांत १२० धावा करून तंबूत माघारी परतला. ट्राविस हेड याने ४ धावा केल्या. वैभव अरोरा याने शानदार गोलंदाजी करत हर्षित राणाकडे त्याला झेलबाद केले. अभिषेक शर्मा याने २ धावा केल्या आणि तो तंबूत परतला. अभिषेक शर्माला हार्षित राणा याने चांगली गोलंदाजी करत व्यंकटेश अय्यरकडे झेलबाद केले. इशान किशन हा देखील २ धावांवर बाद झाला. वैभव अरोरा याने त्याला अजिंक्य रहाणेकडे झेलबाद केले. नितीशकुमार रेड्डी १९ धावांवर बाद झाला. रसेल याने नार्नेकडे त्याला झेलबाद केले. कामिंदू मेंडीस याने २७ धावा केल्या. हेनरिच क्लासेन याने ३३ धावा केल्या. वैभव अरोरा याने मोइनकडे त्याला झेलबाद केले. अनिकेत वर्मा याने ६ धावा केल्या. वरूण चक्रवर्ती याने व्यंकटेश अय्यर याच्याकडे त्याला झेलबाद केले. पॅट कमिन्स याने १४ धावा केल्या. हर्षल पटेल याने ३ धावा केल्या. रसेल याने चेंडू टाकत स्वत; त्याचा झेल घेत त्याला बाद केले. महमद शामी याने नाबाद २ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता : डीकॉक १, नार्ने ७, अजिंक्य रहाणे ३८, रघूवंशी ५०, व्यंकटेश अय्यर ६०, रिंकू सिंग ३२, रसेल १, अवांतर ११ एकूण २० षटकांत २००/६
हैदराबाद : हेड ४, अभिषेक शर्मा २, इशान किशन २, नितीशकुमार रेड्डी १९,कामिंदू मेंडीस २७, क्लासेन ३३, अनिकेत वर्मा ६, पॅट कमिन्स १४, हर्षल पटेल ३, शमी २, सिमरनजित सिंग ० एकूण १६.४ षटकांत १२०/१०
Related
Articles
महानगरातील शासकीय जमिनी प्राधिकरणांच्या नावावर
09 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
मुलींच्या सुरक्षेसाठी सजग होणे गरजेचे : डॉ. गोर्हे
12 Apr 2025
महिलेच्या आकस्मिक मृत्यूनंतर विमान तातडीने उतरवले
08 Apr 2025
महानगरातील शासकीय जमिनी प्राधिकरणांच्या नावावर
09 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
मुलींच्या सुरक्षेसाठी सजग होणे गरजेचे : डॉ. गोर्हे
12 Apr 2025
महिलेच्या आकस्मिक मृत्यूनंतर विमान तातडीने उतरवले
08 Apr 2025
महानगरातील शासकीय जमिनी प्राधिकरणांच्या नावावर
09 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
मुलींच्या सुरक्षेसाठी सजग होणे गरजेचे : डॉ. गोर्हे
12 Apr 2025
महिलेच्या आकस्मिक मृत्यूनंतर विमान तातडीने उतरवले
08 Apr 2025
महानगरातील शासकीय जमिनी प्राधिकरणांच्या नावावर
09 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
मुलींच्या सुरक्षेसाठी सजग होणे गरजेचे : डॉ. गोर्हे
12 Apr 2025
महिलेच्या आकस्मिक मृत्यूनंतर विमान तातडीने उतरवले
08 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज