E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्हा ते त्याच्याशी प्रेमाने बोलत. जे काही जवळ असेल ते त्याला खाऊ घालत. एक दिवस एक तरुण त्यांना भेटायला आला. त्यांच्या बोलण्याने तो प्रभावित झाला आणि त्यांचा शिष्य बनून तेथेच राहू लागला. संताने त्याला तपश्चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्याने गुरूच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरू केली. गुरुशिष्य स्नेहभावनेने राहू लागले. एकदा संत त्याला म्हणाले, ’मन मोठे चंचल असते, त्याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे.’ ही गोष्ट शिष्याच्या मनावर ठसली. त्या दिवसापासून त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. संताने त्याला विचारले असता शिष्य म्हणाला की, तो त्याच्या मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. शिष्य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला. आश्रमात येणार्या जाणार्याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरूने शिष्याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. गुरू आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरूंनी शिष्याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. शिष्याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्ही. गुरु म्हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. शिष्य म्हणाला, गुरुजी असे कसे शक्य आहे. गुरुजी शांतपणे शिष्याला म्हणाले,’ज्याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्म्यावर पडलेली असते. ती धूळ विसरण्याचा प्रयत्न केला तरच खरेपणा दिसून येतो.’ शिष्याला गुरूची शिकवण समजून आली.
तात्पर्य : चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.
-----------
यश हे आपल्या जीवनातील मार्गदर्शक प्रकाशासारखे आहे. जेव्हा आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि मेहनत करत राहतो, तेव्हा यश आपल्यामागे येते, अगदी सावलीसारखं. सावलीसारखा यश पकडण्याचा प्रयत्न न करता, आपला मार्ग चालत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा आणि यश आपोआप तुमच्यासोबत येईल.
-----------
तिच्या घरचे म्हणाले होते
आमची मुलगी दोन मिनिटात स्वयंपाक करते
नंतर कळलं की
ती रोज मॅग्गी बनवत होती.
-----------
दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या दोन प्रयोगशाळा आहेत. तिथे तुमच्या आत्मविश्वासाची व क्षमतेची परीक्षा घेतली जाते... म्हणुनच जीवनात मिळालेल्या यशाचा पुरेपूर आनंद घ्यायला शिका पण त्याच बरोबर पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरु नका.
हीच तर तुमची खरी परीक्षा आहे.
-----------
मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा, नाशिक, पुणे व अख्खा महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, भोपाळ, व अख्खा भारत देश, दुबई, सौदी येथील बाजारपेठेपासून गल्ली गल्लीत प्रत्येक रस्त्यावर देवगडचे एवढे आंबे विकायला येतील की देवगडच्या लोकांना प्रश्न पडेल- आपल्या झाडांना एवढं आंबे कधी लागले?
------------
कर्तृत्वाचा गर्व
शिवराजने एकदा सहदेव महाराजांना घरी आणले. शेतावरच्या बंगल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. महाराजांची पूजाअर्चा, ध्यान-धारणा सारे कसे ठीक चालत होते. एके दिवशी सकाळी शिवराज सहदेव महाराजांसह शेताच्या बांधावरून फिरत होता. त्यांना आपली स्वकष्टार्जित शेती दाखवत होता. एवढा सारा व्याप मी एकट्यानेच कसा उभा केला, आता किती कौशल्याने हा सारा व्याप मी सांभाळतो, हे काहीशा गर्वाने महाराजांना दाखवत होता. तेव्हा महाराज म्हणाले, गड्या, तुझा एवढा व्याप माझ्याने पाहणे शक्य नाही. ही सारी मालमत्ता मला नकाशावर दाखव ना. शिवराजने ते मान्य केले. घरी आल्यावर त्याने नकाशा काढून, त्यावर मापे टाकून सारी शेतवाडी दाखविली. सहदेव महाराजांनी हाती एक सुई धरीत म्हटले, शिवराज, या विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात आपली पृथ्वी ह्या सुईच्या टोकाएवढी, त्यात आपला देश, त्यात राज्य, मग जिल्हा-तालुका आणि अखेर तुझं हे गाव. आता या गावातील तुझी शेतीवाडी दाखव बरं. ते बोलणे ऐकून शिवराज लाजला. क्षणार्धात त्याचा गर्व ओसरला.
तात्पर्य : कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच. नम्रता बाळगली, तर उन्नती निश्चितच!
-----------
जी गोष्ट आपल्याला आव्हान देते...
तीच गोष्ट आपल्यात बदल घडवू शकते...
भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल; परंतु...
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे...
जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते...
तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते...
आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखेच असते...
शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि...
माणसाची निवड चुकली की पूर्ण आयुष्यच बिघडते...
भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो...
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो...
पण आयुष्याचा आनंद फक्त आणि फक्त वर्तमानकाळच देतो...
-----------
संता पोलिसात भरती होतो.
एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो
संता : साहेब, इथं एका महिलेने आपल्या
पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय!
पोलीस इन्स्पेक्टर : का?
संता : तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून...
पोलीस इन्स्पेक्टर : मग त्या महिलेला अटक केली का नाही?
संता : नाही अजून फरशी थोडीशी ओली आहे!
-----------
Related
Articles
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
धरणातील पाणीसाठा समाधानकारक; पण...
30 Apr 2025
तीन महिला नक्षलवादी चकमकीत ठार
25 Apr 2025
आयफोनच्या उत्पादनात भारताचा वाटा
26 Apr 2025
धुव्वाधार तेजीवर युद्धाची छाया
28 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
धरणातील पाणीसाठा समाधानकारक; पण...
30 Apr 2025
तीन महिला नक्षलवादी चकमकीत ठार
25 Apr 2025
आयफोनच्या उत्पादनात भारताचा वाटा
26 Apr 2025
धुव्वाधार तेजीवर युद्धाची छाया
28 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
धरणातील पाणीसाठा समाधानकारक; पण...
30 Apr 2025
तीन महिला नक्षलवादी चकमकीत ठार
25 Apr 2025
आयफोनच्या उत्पादनात भारताचा वाटा
26 Apr 2025
धुव्वाधार तेजीवर युद्धाची छाया
28 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
धरणातील पाणीसाठा समाधानकारक; पण...
30 Apr 2025
तीन महिला नक्षलवादी चकमकीत ठार
25 Apr 2025
आयफोनच्या उत्पादनात भारताचा वाटा
26 Apr 2025
धुव्वाधार तेजीवर युद्धाची छाया
28 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी
27 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
2
हल्लेखोरांना कल्पना नसेल अशी शिक्षा देऊ
3
छुप्या युद्धाचा भाग
4
शिबिरातले मंथन काँग्रेसला पूरक?
5
सोन्याचे दर आकाशात
6
व्यापारयुध्द शमलेले नाही