E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडले
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
चालक दीपकला न्यायालयाकडून मात्र दिलासा
नवी दिल्ली : दिल्लीच्या शेजारील नोएडा शहरात आलिशान लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडल्याची घटना घडली. ज्यामध्ये दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले. न्यायालयाने मात्र आता चालकाला निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी चालक दीपकला सूरजपूरच्या जिल्हा न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाकडून आता जामीन मिळाला आहे. रविवारी सायंकाळी चालक दीपकने लॅम्बोर्गिनी चालवताना फूटपाथवर बसलेल्या दोन कामगारांना चिरडले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जमावाने आरोपी चालकाला घेरले. यावेळी दीपक 'कोणी मरण पावले आहे का?' असा उलट प्रश्न करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसत आहे.
ग्रेटर नोएडातील सूरजपूर येथील जिल्हा न्यायालयाने सोमवारी लॅम्बोर्गिनी मोटार चालक दीपक याला जामीन मंजूर केला. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नोएडाच्या सेक्टर ९४ मध्ये एका भरधाव वेगात असणाऱ्या लॅम्बोर्गिनी मोटारीने पदपथावर बसलेल्या दोन कामगारांना चिरडले. अपघात घडताच सेक्टर-१२६ पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दीपकला बेड्या ठोकल्या. तेव्हापासून दीपक तुरुंगात होता. आज सकाळी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. खटल्याच्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने दीपकला जामीन मंजूर केला.
लॅम्बोर्गिनी चालक दीपक कोण ?
नोएडा पोलिसांनी रविवारी सांगितले की, सेक्टर ९४ जवळ एका लॅम्बोर्गिनी कारचा (नोंदणी क्रमांक PY05C7000) अपघात झाला. मोटारीचा मालक मृदुल तिवारी असून तो सुपरनोव्हा येथील रहिवासी असल्याचे समजते. दीपकच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर दोन कामगार जखमी झाले. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जयकिशनचा मुलगा दीपक हा अजमेरचा रहिवासी आहे. घटनास्थळावरून दीपकला अटक केल्यानंतर, वाहन ताब्यात घेण्यात आले.
दीपक कुमार हा राजस्थानमधील एक ब्रोकर असून तो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मृदुल तिवारी यांच्याकडून लॅम्बोर्गिनी कार खरेदी करण्यासाठी नोएडात आला होता. तर गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेत असताना हा अपघात घडला. मृदुलला युट्यूबवरून सिल्व्हर, गोल्ड आणि डायमंड बटण मिळाले आहेत. देशातील टॉप-१० सर्वात यशस्वी युट्यूबर्समध्ये मृदुलचे नाव घेतले जाते.
Related
Articles
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
07 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
02 Apr 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे समाजाचे ध्रुवीकरण : सोनिया
04 Apr 2025
वाचक लिहितात
08 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मलेशियातील आगीत १०० जखमी
4
’पीएमपी’च्या बसमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय
5
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
6
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न