E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रियान परागला नियम तोडल्याचा फटका
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नवी दिल्ली : राजस्तान रॉयल्सने आयपीएल २०२५ मधील घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात चेन्नईचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात संदीप शर्माच्या २०व्या षटकातील भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्तानने ६ धावांनी सामना जिंकला. राजस्तानचा नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्त्वाखाली हा संघाचा पहिला विजय होता. पण या विजयानंतर कर्णधार रियान परागला त्याच्या चुकीचा फटका बसला आहे.
राजस्तानचा नियमित कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे रॉयल्स संघाचे सुरूवातीच्या सामन्यात नेतृत्त्व करण्याची जबाबदारी रियान परागच्या खांद्यावर होती. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रियानच्या नेतृत्त्वाखाली संघाला पराभवाचा धक्का बसला. पण तिसर्या सामन्यात मात्र संघाने ही चूक सुधारली आणि विजयाला गवसणी घातली.
कर्णधार रियान परागला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२५ मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळणारा रियान पराग हा दुसरा कर्णधार आहे. त्याच्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्तानने चेन्नईविरुद्ध ६ धावांनी विजय मिळवला, त्यानंतर कर्णधार रियान परागला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास आयपीएल संघांच्या कर्णधारांना ही रक्कम द्यावी भरावी लागते.
नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी उतरला. संघाची सुरुवात खराब झाली, कारण पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. तो लवकर बाद झाल्यानंतर, नितीश राणा आणि संजू सॅमसन यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. नितीशने अवघ्या ३६ चेंडूंत ८१ धावांची खेळी खेळली, ज्यात दहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. तर कर्णधार रियान परागने शानदार ३८ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला सुरूवातीलाच धक्के बसले. रचिन रवींद्र खाते न उघडताच बाद झाला. राहुल त्रिपाठीची बॅट लागली पण मोठी धावसंख्या करू शकला नाही. तर ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२५ मधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.
Related
Articles
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
वाचक लिहितात
03 Apr 2025
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
07 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
वाचक लिहितात
03 Apr 2025
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
07 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
वाचक लिहितात
03 Apr 2025
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
07 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
वाचक लिहितात
03 Apr 2025
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
07 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक