E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
विशाखापट्टणम : दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा दारूण पराभव करत सहज विजय मिळविला. मिचेल स्टार्कने ५ बळी घेत मोठी भूमिका बजावली. त्यामुळे सामनावीर म्हणून मिचेल स्टार्कला गौरविण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक सामन्यात वादळी फलंदाजी करणार्या सनरायझर्स हैदराबादवर ७ बळीने मोठा शानदार विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबाद संघाला सर्वबाद करत दिल्लीने २५ चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला.
दिल्लीने सुरूवातीपासूनच सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला आणि अखेरीस विजय मिळवून गतवर्षीच्या सामन्यातील पराभवाचा व्याजासकट बदला घेतला. मिचेल स्टार्कचे पाच विकेट्स आणि नंतर प्रत्येक फलंदाजाने फलंदाजीत दिलेले योगदान यामुळे दिल्लीचा संघ हा सलग दुसरा विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरूवात केली. जेक फ्रेझर मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस यांनी सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला.हैदराबादची विस्फोटक सलामी खेळी या सामन्यात फेल ठरली. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात विचित्र पद्धतीने झेलबाद झाला. तर पॉवरप्लेमध्येच स्टार्कने दोन षटकात हैदराबादला ३ झटके दिले. स्टार्कने ट्रॅव्हिस हेड, इशान किशन आणि नितीश रेड्डीच्या विकेट घेत हैदराबादला धक्का दिला. यानंतर अनिकेत वर्माने एकट्याने हैदराबादला १५० च्या वर पोहोचवले.
अनिकेते ४१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७४ धावांची शानदार खेळी केली. तर क्लासेन ३२ धावा करत बाद झाला. याशिवाय कोणताच फलंदाज १० धावांचा आकडाही गाठू शकला नाही. दिल्लीकडून स्टार्कने ३.४ षटकांत ३५ धावा देत ५ बळी घेतले. तर कुलदीपने ४ षटकांत २२ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय मोहित शर्माच्या खात्यात महत्त्वाची क्लासेनची विकेट मिळाली. यासह हैदराबादचा संघ १६३ धावा करत सर्वबाद झाला
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : फाफ ड्यू प्लेसीस ५०, जेक मॅकगर्ग ३८, अभिषेक पोरेल ३४, के.एल.राहुल १५, त्रिशान स्टब्ज नाबाद २१, अवांतर ८, एकूण १६ षटकांत १६६/३
हैदराबाद : अनिकेत वर्मा ७४, अभिषेक शर्मा १, हेड २२, इशान किशन २, नितीश रेड्डी ०, क्लासेन ३२, कमिन्स २, मुडलर ९, हर्षल पटेल ५ एकूण १८.४ षटकांत १६३/१०
Related
Articles
बिम्सटेक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौर्यावर
04 Apr 2025
टोंगात भूकंप; त्सुनामीचा इशारा
01 Apr 2025
शहरातील पाणी पुरवठा गुरूवारी बंद
01 Apr 2025
रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता
03 Apr 2025
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
01 Apr 2025
भाजप-डाव्यांचा बंगालमध्ये दंगली भडकाविण्याचा प्रयत्न

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले