E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ओला आणि उबरच्या धर्तीवर केंद्राकडून ’सहकार टॅक्सी’ सेवा
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
नवी दिल्ली
: केद्र सरकाराकडून ओला आणि उबरच्या धर्तीवर सहकारी टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी गुरूवारी संसदेत घोषणा केली. याअंतर्गत मोटार, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालकांसाठी ही सेवा फायद्याची आहे. यातून मिळणारा संपूर्ण नफा थेट चालकाला जाणार असून त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याच्या कारभार असल्याने यासंदर्भात एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि वाहन चालक बेरोजगारच राहायचे. आता असे होणार नसून त्यासाठी एक सहकारी टॅक्सी सुरू करण्यात येईल, ज्यामुळे चालकांना त्यांचा थेट नफा मिळण्यास मदत होईल.
यावेळी अमित शहा म्हणाले, सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी सेवा चारचाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहनांची नोंदणी करेल. या टॅक्सी सेवेत नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा थेट चालकाला मिळेल. मोठा भाग कोणत्याही श्रीमंत माणसाच्या हातात जाणार नाही. त्यांनी सांगितले की लवकरच एक सहकारी विमा कंपनी स्थापन करणार आहे. लवकरच ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल. खरे तर, उबर आणि ओला सारख्या कंपन्यांच्या सहकार्याने टॅक्सी चालवणार्या चालकांना त्यांच्या कमाईचा काही भाग द्यावा लागतो. सबस्क्रिप्शन फी भरावी लागते आणि चालकांना प्रत्येक राइडवर कंपनीला एक निश्चित कमिशन देखील द्यावे लागते.सहकारी टॅक्सी सेवांमुळे, दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊ शकते.
Related
Articles
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये लष्कर मदती ऐवजी एअरस्ट्राइक
01 Apr 2025
राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणार
02 Apr 2025
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
01 Apr 2025
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
06 Apr 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले