व्हॅनला मालमोटारीची धडक; दहा विद्यार्थी जखमी   

अकोला : विद्यार्थ्यांच्या व्हॅनला भरधाव मालमोटारीने धडक दिली. या भीषण अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अकोल्यातील पातुर-बाळापूर रस्त्यावरील वाडेगावजवळ बुधवारी सकाळी हा अपघात झाला.अपघातग्रस्त व्हॅन शालेय मुलांना घेऊन पातुर-बाळापूर रस्त्यावरून जात होती. बाळापूरकडून वाशिमकडे जाणार्‍या विटांनी भरलेल्या मालमोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालमोटारीने व्हॅनला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्य राबवत विद्यार्थ्यांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. १० विद्यार्थी जखमी आहेत. त्यामधील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेत रस्ता रोखा आंदोलन केले. वाडेगावजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. 

Related Articles