नाशिक : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधमांनी घरात घुसून मुलीच्या शरीराचे लचके तोडले. कोणाला याबद्दल सांगू नये म्हणून तिला जिवे मारण्याची धमकी ही त्यांनी दिली होती. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही घटना घडली.पीडित मुलीची आई मजुरी कामासाठी गेली होती, त्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच होती. हाच डाव साधत पाच जणांनी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी तिला देण्यात आली होती. बलात्कार केल्यानंतर पाच संशयित आरोपी फरार झाले आहेत. या घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाऊनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Fans
Followers