E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कोलकात्याचा शानदार विजय
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
गुवाहाटी : राजस्तान रॉयल्सचा संघ विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघ हे बुधवारी सायंकाळी आमने सामने आले होते. हा सामना कोलकात्याच्या संघाने ८ फलंदाज राखुन जिंकला. या सामन्याआधी नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय कोलकात्याच्या संघाने सार्थ ठरविला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत राजस्तानच्या संघाला २० षटकांत १५१ धावांवर रोखले. यावेळी ९ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. त्यामुळे कोलकात्याच्या संघाला १५२ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कोलकात्याचा सलामीवीर डीकॉक याने नाबाद ९७ धावा केल्या. त्याला साथ देणारा मोइन अली मात्र अवघ्या ५ धावांवर बाद झाला. तर मधल्या फळीत आलेला अजिंक्य रहाणे हा १८ धावांवर बाद झाला तर अंगरिश रघुवंशी याने नाबाद २२ धावा केल्या. तर ११ अवांतर धावा मिळाल्या.
या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांपैकी वरुण चक्रवर्ती याने २ फलंदाज बाद केले तर मोइन अली याला २ बळी टिपता आले. हर्षित राणा याने देखील २ फलंदाज आणि वैभव अरोरा याने २ गडी तंबूत माघारी पाठविले. जॉन्सन याला १ गडी बाद करता आला. राजस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकून राहता आले नाही.
यशस्वी जैस्वाल २९ धावांवर बाद झाला. त्याला मोइन अली याने शानदार गोलंदाजी करत हर्षित राणाकडे झेलबाद केले. तर दुसर्या क्रमांकावर आलेला संजू सॅमसन याला १३ धावांवर वैभव अरोरा याने बाद केले. रियान पराग २५ धावा करून बाद झाला. नितीश राणाचा ८ धावांवर त्रिफळा मोइन अली याने उडविला. वानिंदू हसरंगा याने ४ धावा केल्या. तर ध्रुव ज्युरेल याला ३३ धावांवर हर्षित राणा याने तिफळाबाद केले. शुभम दुबे याने ९ धावा केल्या. त्याला वैभव अरोरा याने शानदार गोलंदाजी करत रसेलकडे झेलबाद केले. हॅटमायर ७ धावांवर बाद झाला. जोफ्रा आर्चर याने १६ धावा केल्या. त्याचा त्रिफळा जॉन्सन याने उडविला. महेश तिक्क्षणा १ धावेवर नाबाद राहिला. तुषार देशपांडे याने २ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता : डीकॉक ९७, मोइन अली ५, अजिंक्य रहाणे १८, अंगरिश रघुवंशी नाबाद २२, अवांतर ११, एकूण : १७.३ षटकांत १५३/२
राजस्तान : जैस्वाल २९, सॅमसन १३, रियान पराग २५, नितीश राणा ८, हसरंगा ४, ध्रुव ज्युरेल ३३, दुबे ९, हॅटमायर ७, आर्चर १६, एकूण २० षटकांत १५१/९
Related
Articles
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
01 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
01 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
01 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी
30 Mar 2025
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
01 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान