E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
पायी दिंडी, पालखी, समिती, मंडळ यांना ऑनलाईन नोंदणी बंधनकारक
यात्रा नियोजन समितीची सूचना
आळंदी
(वार्ताहर) : आद्यस्वयंभू श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे लाखोंच्या संख्येने पायी येणार्या भाविक भक्तांच्या दिंडी, पालखी, यात्रा आदी संबंधित विविध समिती मंडळांना श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणार्या विविध सेवा-सुविधा, प्रशासकीय नियंत्रण तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी आता सर्व संबंधितांना ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात येत आहे. यासाठी झालेल्या यात्रा नियोजन समितीने प्रशासकीय कार्याचा भाग म्हणून जाहीर सूचना केली आहे.
चैत्रोत्सव काळात भाविकांच्या गर्दीचे नियोजन, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रीये संबंधित निर्धारीत पूर्तता करून उत्सव कालावधीत भाविक भक्तांना सुलभ व सुरक्षित नियोजन होण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने विश्वस्त संस्था, श्रीक्षेत्र सप्तशृंगगड ग्रामपंचायत व नांदुरी ग्रामपंचायत यांसह जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग यांच्या सहभागातून आयोजित केलेले यात्रा नियोजन बैठकीत निर्णय घेऊन ठरविण्यात आले आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे गुगल फॉर्म प्रकारात ऑनलाईन नोंदणी कार्यान्वित केलेली असून, सर्व दिंडी / पालखी / यात्रा समिती / मंडळा अंतर्गत येणार्या भाविक भक्तांचे प्रातिनिधिक स्वरूपात अत्यावश्यक व अद्ययावत तपशील उपलब्ध करून त्यांच्या सेवा-सुविधा अनुषंगिक योग्य तो समन्वय पूर्तता करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. यासाठी चैत्रोत्सव २०२५ दरम्यान सर्व पायी प्रकारात येणार्या पायी दिंडी, पालखी समिती / मंडळ यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
यासाठी ऑनलाईन नोंदणी व प्रक्रिया ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली असून, भविष्य काळात अधिक प्रभावीपणे पायी येणार्या भाविक भक्तांना (दिंडी पालखी यात्रा आदी) श्रीक्षेत्र येथे अत्यावश्यक सुलभ दर्शन तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधा तसेच प्रवासा दरम्यान जिल्हावार स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महाराष्ट्र शासना मार्फत विशेष सेवा-सुविधा कार्यान्वित करणेकामी उपयुक्त ठरणार आहे. पर्यायी विश्वस्त संस्था व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पायी येणार्या भाविक भक्तांच्या दिंडी पालखी यात्रा संबंधित विविध समिती, मंडळांना ऑनलाईन नाव नोंदणीसाठी आवाहन पुढील लिंक वर करण्यात आले आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FIpQLSfRXLeh605mv7Cjd3bzJv-em1vwtqBo3uij9S4kk8ZDe2suxw/viewform या ऑनलाईन लिंकवर (गुगल फॉर्म) आपल्या नियोजित दिंडी/ पालखी/यात्रा आदी संबंधित समिती/मंडळांची नोंदणी करून चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील यात्रा नियोजन समिती व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिकेला योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी या संदर्भात माहिती दिली.
Related
Articles
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस
31 Mar 2025
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा
28 Mar 2025
पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या सीएनजी बस उपलब्ध
31 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस
31 Mar 2025
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा
28 Mar 2025
पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या सीएनजी बस उपलब्ध
31 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस
31 Mar 2025
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा
28 Mar 2025
पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या सीएनजी बस उपलब्ध
31 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस
31 Mar 2025
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा
28 Mar 2025
पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या सीएनजी बस उपलब्ध
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान