E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
खासदार मालामाल, पेन्शनर उपाशी!
संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार आता खासदारांचे वेतन घसघशीत वाढले आहे. त्यांचे दरमहाचे वेतन १ लाखावरुन १ लाख २४ हजार रुपये झाले आहे. त्यांचा दैनंदिन भत्ता २००० रुपयावरुन २५०० रुपये झाला आहे. माजी खासदारांचे निवृत्त वेतन २४ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ते २५००० रुपयांवरुन ३१ हजार रुपये करण्यात आले आहे; मात्र खासगी क्षेत्रातील कर्मचारी भविष्य निधीच्या (इपीएफ) पेन्शनधारकांना केवळ १५०० ते ३५०० रुपये एवढेच तुटपुंजे वेतन मिळते. गेली १०-१२ वर्षे या कर्मचार्यांची संघटना दरमहा ७५०० रुपये निवृत्तीवेतन करावे, अशी मागणी करीत आहे; मात्र केंद्र सरकारला त्यांची दया येत नाही. याउलट खासदार-आमदारांचे भत्ते आणि वेतन वर्षा-दोन वर्षांनी लगेच वाढते. सरकारी कर्मचारीही नियमितपणे वेतन वाढ आणि महागाई भत्त्याच्या वाढीचे लाभार्थी होतात. मग इपीएफ पेन्शनधारकांवरच अन्याय का? हे खासदार पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतन वाढीसाठी आग्रही का नसतात?
प्रतीक नगरकर, पुणे
हरवलेले जुने पुणे
शहरात अनेक कारणांमुळे प्रदूषण वाढले आहे. वायूत सिमेंट इतके वाढले आहे, की फरशी, कपडे, फर्निचर, संगणक, दारे-खिडकी, फ्रिज व इलेक्ट्रॉनिक मशिनवर राखाडी थर दिसतो. झाडे, फांद्या, पाने, फुलांवर ही धूळ साचते. ध्वनी प्रदूषणपण असहाय्य झाले, त्यात सूर्य आग ओकत आहे. हे कमी की काय, शहरातील काही भागात आताच पाणीटंचाई भासू लागली. रस्ता अपघात, घातपात, मनुष्यवध, वाहतूक कोंडी नित्याचे झाले. पोलिसांचा धाक उरला नाही. करदात्यांची लूट चालली आहे. प्रशासन व इतर विभाग कामचलाऊ झाले. त्यामुळे सगळा सावळा गोंधळ कारभारात भर पडली. आता राजकीय पक्ष स्वच्छता मोहीम सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भ्रष्टाचार-लाचलुचपत सर्रास चालू आहे. तरुण पिढी व्यसनी झाली. त्यांना पुण्यात शिक्षण घेण्यापेक्षा परदेशी पळण्यात विशेष आनंद. कुठे नेऊन ठेवले माझे सुंदर-सुरक्षित-स्वच्छ- सुसंस्कृत पुणे?
नीलम सांगलीकर, पुणे.
पर्यावरणाची हानी
उन्हाळा जसा तापू लागतो, तसे वन खात्याच्या जंगलांना आगी लागण्याच्या घटनात वाढ होते. आताही राज्यात कोठेना कोठे वन खात्याच्या जंगलांना आगी लागून वणवे पेटल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. उन्हाळ्यात लागणारे हे वणवे नैसर्गिक असल्याचे भासवले जाते; पण यातील बरेचसे वणवे मानवनिर्मितच असतात. काही समाजकंटक जाणीवपूर्वक शहराजवळच्या डोंगरावरील हिरवाईला वणवे लावून ती नष्ट करतात. चराईकरिता चांगले गवत यावे या हेतूने हे वणवे लावले जातात. लाकूडफाटा, कोळसा मिळवण्यासाठी तसेच शेती व शिकारीसाठी जमीन तयार करण्यासाठी या बहुमोल निसर्गसंपदेला आगी लावल्या जातात. या आगीत वृक्ष, वनस्पती, वन्यजीवांची हानी, स्थलांतर यामुळे जे नुकसान होत असते त्याची भरपाई होण्यास खूप वर्षांचा कालावधी जातो. निसर्गाची अपरिमित हानी होते. झाडांना लावल्या जाणार्या या आगी म्हणजे राष्ट्रीय हानी आहे. वणव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळायची असेल तर मानवनिर्मित वणवे रोखायलाच हवेत.
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
गोल्ड कार्डद्वारे गुंतवणुकीसाठी हाक
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी गुंतवणूकदारांसाठी गोल्ड कार्ड ही नवी योजना जाहीर केली आहे. जर अमेरिकेमध्ये ५० लाख डॉलर्सची गुंतवणूक केली तर अमेरिकेचा व्हिसा त्या व्यक्तीला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकन नागरिकत्वाचा मार्गही त्या व्यक्तीसाठी खुला होणार आहे. जे श्रीमंत आहेत व खूप पैसा खर्च करतात, तसेच मोठ्या प्रमाणावर करसुद्धा भरतात, अशा लोकांना ही एक संधी आहे. तसे अमेरिकन नागरिकत्व मिळणे अलीकडच्या काळात अवघड झाले आहे. अमेरिकन सरकार एक कोटी गोल्ड कार्ड विकू शकते. आज अमेरिकेसारख्या प्रगत व स्वच्छ शहरात नोकरी किंवा एखादा उद्योग मिळणे हे एक भाग्यच म्हणावे लागेल. यामुळे अमेरिकेचा सुद्धा फायदाच होणार आहे. कारण अमेरिकेत नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार आहे.
शांताराम वाघ, पुणे
बस चालकांना नियमांचा धाक नाही?
मुंबई ते पुणे महामार्गावर धावणार्या शिवनेरी बसचा चालक स्वतःबरोबरच प्रवाशांचा जीव धोक्यात घालत मोबाईल फोनवर आयपीएल टी-२० क्रिकेटचा सामना पाहत असल्याचे समोर आल्यानंतर एसटी महामंडळाने त्या चालकावर बडतर्फीची कारवाई केली; पण बसचालकांचे बस चालवताना फोनवरील हे जीवघेणे बोलणे कधी थांबणार? हाच खरा कळीचा प्रश्न आहे. कारण मोबाईल फोनवर बोलताना बस चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडल्याच्या घटना राज्यात काही नवीन नाहीत. गेल्या काही वर्षात बस चालकांच्या बस चालवताना मोबाईल फोनवर बोलण्याच्या सवयीमुळे अनेक सर्वसामान्य प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १९ तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम २१ नुसार गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे गुन्हा आहे. त्याचे उल्लंघन वारंवार का होते? त्याचा धाक चालकांना का नाही?
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
Related
Articles
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या
29 Mar 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या
29 Mar 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या
29 Mar 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
नवसर्जनाचे स्वागत करु या...
30 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या
29 Mar 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान