E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मतदार याद्या परिपूर्ण करणार : जिल्हाधिकारी
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
पुणे
: जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार यादीमध्ये असलेली दुबार नावे, मयत झालेल्या व्यक्तींची नावे, कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे यासंदर्भात माहिती घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत डुडी बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येऊन एकाच मतदार यादीत नाव असेल याची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत खात्री केली जाईल. मतदार याद्यांमधील मयत मतदारांची नावे वगळण्यात येतील. यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या कार्यालयाकडून मयत झालेल्या व्यक्तींच्या अभिलेख नोंदीच्या याद्या घेऊन त्याप्रमाणे मतदार यादीमध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नावे कमी करण्यात येतील. तसेच कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या मतदारांच्या बाबत बीएलओ मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल. कामांसाठी प्रशासनाकडून बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल. मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने समावेश केले असेल तर प्रशासनाकडून याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवली जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी दिले.या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरवातीला या संदर्भातील माहितीचे निवडणूक शाखेकडून सादरीकरण करण्यात आले.
Related
Articles
श्रेयसच्या अर्धशतकामुळे पंजाबचा विजय
26 Mar 2025
सैन्य दलात भरतीसाठी ’युगांतर २०४७’चे आयोजन
23 Mar 2025
नागपूर हिंसाचार प्रकरणी ५० जण ताब्यात
19 Mar 2025
लोकसभेच्या जागांसाठी कायदेशीर लढा : स्टॅलिन
22 Mar 2025
रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम
24 Mar 2025
दंगलखोरांकडून नुकसान वसूल करणार : फडणवीस

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात चारशेहून अधिक बळी
2
बेकायदा गॅसची विक्री करणार्यास अटक
3
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
4
मनरेगा मजुरांना द्यावेत ४०० रुपये : सोनिया
5
राज्यात चार दिवस पाऊस पडणार
6
हिंजवडीत धावत्या बसला आग लागल्याने चौघांचा होरपळून मृत्यू