E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नागपूर हिंसाचार प्रकरणी ५० जण ताब्यात
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
संचारबंदी लागू
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणात ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संवेदनशील भागात संचारबंदी लागू असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.हिंसाचार प्रकरणात पाच एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, असे नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र कुमार यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका, असे आवाहनदेखील कुमार यांनी केले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागात पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुघल सम्राट औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमधील कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर, सायंकाळी साडेसातच्या सुमारास महाल परिसरातील चिटणीस पार्कमध्ये हिंसाचार उसळला. जुना भंडारा रोडजवळील हंसापुरी परिसरात रात्री १०.३० ते ११.३० च्या दरम्यान पुन्हा हिंसाचार उसळला. या हिंसाचारात जमावाने अनेक वाहने, घरे आणि रुग्णालयाची तोडफोड केली. या हिंसाचारात ३४ पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये तीन अधिकार्यांचा समावेश आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी काल रुग्णालयात जखमी पोलिस कर्मचार्यांची भेट घेतली.
वातावरण बिघडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला, असेही ते यावेळी म्हणाले. नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सरकारच चिथावणी देत आहे : ओवेसी
नागपूरमधील हिंसाचारास मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचा दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांची अलीकडच्या काळातील विधाने बघा. सरकारच चिथावणी देत असल्याचे यातून स्पष्ट होते, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. नागपूर हिंसाचारास फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही आठवड्यांपासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत, ते तपासण्याची गरज आहे. सरकारकडूनच चिथावणीखोर विधाने केली जात होती, असा आरोपही त्यांनी केला.
Related
Articles
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड निश्चित
26 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
या बदलांकडे द्या लक्ष
01 Apr 2025
जामा मशिदीच्या अध्यक्षांचा हंगामी जामीन अर्ज फेटाळला
28 Mar 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड निश्चित
26 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
या बदलांकडे द्या लक्ष
01 Apr 2025
जामा मशिदीच्या अध्यक्षांचा हंगामी जामीन अर्ज फेटाळला
28 Mar 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड निश्चित
26 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
या बदलांकडे द्या लक्ष
01 Apr 2025
जामा मशिदीच्या अध्यक्षांचा हंगामी जामीन अर्ज फेटाळला
28 Mar 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड निश्चित
26 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
या बदलांकडे द्या लक्ष
01 Apr 2025
जामा मशिदीच्या अध्यक्षांचा हंगामी जामीन अर्ज फेटाळला
28 Mar 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
5
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार