E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही : शिंदे
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
विजय चव्हाण
मुंबई : औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही करू नये. काँग्रेसने ही कबर संरक्षित केली होती. हा औरंगजेब कोणाचा कोण लागतो? तो महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी येथे आला. औरंगजेब हा लुटारू असून तो येऊन देवी-देवतांची मंदिरे मोडली. अनेक देशांनी आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या. तसे, आपणही केले असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, किंग एडवर्ड यांचे पुतळे काढत बदल केले. ज्याने महाराष्ट्रावर अनन्वित छळ केले, अशा औरंगरंजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिला.
शिंदे यांनी काल नागपूर घटनेवर निवदेन दिले. ते म्हणाले, नागपूर महाल परिसरात विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक गवताची कबर जाळली. पण, त्यानंतर वेगळीच अफवा पसरवली गेली. त्यानंतर एक जमाव घोषणा देत रस्त्यावर उतरले. पोलिसांनी या जमावाला हटवले. त्याच वेळी हंसापुरी भागात दगडफेक झाली. यात १२ दुचाकींचे नुकसान झाले, अशी माहिती शिंदे यांनी सभागृहात दिली. काहींवर शस्त्राने वार झाले तर काही घरांवर दगडफेक झाली. पुरोगामी महाराष्ट्राय अशा घटना योग्य नाहीत, असे शिंदे म्हणाले.
नागपूरमध्ये रात्री दोन-पाच हजारांच्या जमावाने पेट्रोल बॉम्ब फेकत हल्ला केला. हा हल्ला नियोजनबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले. पोलिस वाहनांवर हल्ले करण्यात आले. अग्निशमनचे वाहन पेटविण्यात आले, असेह ते म्हणाले. मोमीन पुरा, चिटणीस पार्क, हंस पुरी, महाल परिसरात दंगलसदृश स्थिती झाली होती. पोलिसांवर बाटल्या, दगड, विटा फेकण्यात आल्या, असेही ते म्हणाले.
शिंदे यांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटले. मला माफ करा. मी पुन्हा येतो, असे सांगितले, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात केला. तर अनिल परब यांच्याकडे बोट दाखवत ’तुम्हाला नोटीस आली तेव्हा तुम्ही पण गेले होते. मला यातून सोडवा. तुम्हाला सोडवल्यावर तुम्ही इकडे येऊन तुम्ही ही पलटी मारली, असे शिंदे म्हणाले.
नागपूर घटनेवर उपमुख्यमंत्री निवेदन करत असताना फडणवीस यांनी संभाजी महाजांप्रमाणे छळ केला असल्याचे परब बोलले होते. त्या विधानावर टीका करताना शिंदे परिषदेत बोलत होते. यामुळे गोंधळाला अधिक जोर आला होता. शिंदे म्हणाले की, आम्ही जे केले ते खुलेआम केले असून लपून-छपून केले नाही. धाडस करायला वाघाचे काळीज लागते. तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल करताना परब तुमचा इतिहास मला माहित आहे, असे शिंदे म्हणाले. पक्ष प्रमुखांना काँग्रेस सोबत जाऊ नका, असे सांगितले होते. ठाकरे पक्षाने बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्चीसाठी औरंगरंजेबाचे विचार धरले. त्यामुळे हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याची टीका शिंदे यांनी केली. काँग्रेस सोबत जाऊन सत्ता मिळवली. ते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन याना कारागृहात टाकणार होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपचे आमदार घेणार होते. मात्र, त्यांचा टांगा पलटी केला असल्याचे शिंदे म्हणाले.
Related
Articles
जम्मू - काश्मीरमधून फुटीरतावादी हद्दपार : शहा
26 Mar 2025
लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडले
01 Apr 2025
जल सुरक्षा सुनिश्चित करण्यात हायड्रॉलिक संरचना महत्त्वाची : वर्मा
28 Mar 2025
लष्कराच्या विशेष अधिकार कायद्याला मणिपूरमध्ये मुदतवाढ
31 Mar 2025
ऑस्कर विजेत्या लघुपटाच्या दिग्दर्शकाला घेतले ताब्यात
26 Mar 2025
राजगुरुनगरवासीयांकडून पंजाबमध्ये शहिदांना अभिवादन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
5
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार