पाकिस्तान क्रिकेटपटू जुनैद खानचा मैदानात मृत्यू   

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडिलेडच्या मैदानात पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. मैदानात फलंदाजी करत असताना जुनैद जफर खान नावाचा क्रिकेटरने आपला जीव गमावला. कडाक्याच्या उन्हात खेळणे त्याच्या जीवावर बेतले. 
 
अ‍ॅडिलेडच्या कॉनकॉर्डिया कॉलेजच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबकडून जुनैद मैदानात उतरला होता. प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्धच्या सामन्यात आधी त्याने ४० षटके क्षेत्ररक्षण केले. त्यानंतर फलंदाजी करताना ही घटना घडली. वैयक्तिक १६ धावांवर खेळत असताना तो अचानक मैदानात कोसळला अन् त्याचा मृत्यू झाला. जुनैद खान २०१३ मध्ये पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला होता. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडिलेड येथील एका आयटी कंपनीत तो काम करत होता. 

Related Articles