इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार   

इराकच्या पंतप्रधानांचा दावा 

बगदाद : इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया दहशतवादी संघटनेचा (आयसीस) म्होरक्या ठार झाल्याचा दावा इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी केला. इराकची गुप्तचर संघटना आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने संयुक्तपणे कारवाई करुन त्याचा खात्मा केला आहे. 
 
अब्दुल्ला माकी मोस्लेह अल-रिफाई, किंवा अबू खदिजा, असे म्होरक्याचे नाव आहे. तो स्वत:ला दहशतवादी सांटनेचा उप खलिफा समजत होता.   इराक आणि जागतिक पातळीवरील एक अति जहाल दहशतवादी दहशतवादी मारला गेल्याचे पंतप्रधान सुदानी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी समाज माध्यमावर  शक्तीच्या माध्यमातून शांतता या मथळ्याखाली त्यांनी पोस्ट टाकली आहे. त्यात आयसीसचा पळपुटा म्होरक्या इराकमध्ये ठार झाला असून  आमच्या योध्यांनी त्याला संपविले आहे. त्यासाठी इराकचे सरकार आणि कुर्दीश प्रांतातील सरकारने त्यासाठी मोठी मदत केली. 
 
सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पश्चिम इराकमधील अनबर प्रांतात दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबविली होती. त्या अंतर्गत गुरुवारी रात्री हवाई हल्ला केला होता. रिफाई ठार शुक्रवारी ठार झाल्याची पुष्टी मिळाली. तो ठार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले. आयसीस दहतवादी संघटनेबरोबर संयुक्तपणे लढा देण्याचा विचार इराक आणि सीरिया सरकारने केला होता. सीरियाचे राजदूत इराक दौर्‍यावर प्रथमच आले होते. त्यानंतर एक दिवसानंतर हल्ल्यात म्होरक्या मारला गेला आहे. 
 
इराकचे परराष्ट्र मंत्री फारुख हुसेन यांनी देखील रिफाई मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयसीएस इराक आणि सीरियासाठी डोकेदुखी बनली आहे. तिच्या समूळ उच्चाटणासाठी दोन्ही देश कार्यरत आहेत. ते म्हणाले, सीरिया, इराक, तुकिैये, जॉर्डन आणि लेबानन या देशांनी संयुक्तपणे कृती करण्याचे ठरविले आहे. या संदभार्ंतील एक बैठक अमन येथे झाली. दहतवाद्यांविरोधात एक कृती विभाग तयार केला आहे. सीरियात अध्यक्ष बशर असद यांच्या नेतृत्चाखालील सरकार बंडखोरांनी पाडले आहे. त्यानंतर सीरिया आणि इराकमधील संबंध काहीसे बिघडले आहेत. इराकमध्ये अल सुदानी यांच्या नेतृत्वाखालील सरकार इराणचा पाठिंबा असलेला गट आणि तेहरानच्या मदतीने सत्तेवर आहे. सीरियात सध्या हंगामी सरकार अहमद अल शारा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. पूर्वी त्याला अबु मोहम्मद अल गोलानी या नावाने ओळखले जात होते. तो अल कायदा दहशतवादी संघटनेसाठी कार्य करत होता. अमेरिकेने २००३ मध्ये इराकवर हल्ला केला. तेव्हा तो अमेरिकेविरोधात आणि नंतर असद यांच्या सरकारविरोधात लढला होता. 
 

Related Articles