पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला   

कराची : जाफर एक्सप्रेसचे अपहरण करत प्रवाशांना ओलिस ठेवणार्‍या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) सर्व ३३ बंडखोरांना आम्ही ठार मारले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचा हा दावा बीएलएने फेटाळला आहे. युद्ध अजून संपलेले नाही, असे सांगतानाच आम्ही १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले असल्याचा दावा बीएलएने केला आहे.
 
या कारवाईत २१ नागरिकांसह ४ सैनिक ठार झाले. तर, ३५० हून अधिक ओलिसांची आम्ही सुटका केली, असा दावा पाकिस्तानने केला होता. दरम्यान, पाकिस्तान मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची खरी संख्या लपवत आहे. कारण, त्यांना सैन्याचे मनोबल तोडायचे नाही, असे बीएलएने म्हटले आहे. 

Related Articles