मार्क कार्ली बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान   

टोरंटो : मार्क कार्ली यांनी शुक्रवारी कॅनडाचे २४ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेशी बिघडलेल्या संबंधांदरम्यान त्यांनी कॅनडा सरकारची सूत्रे हाती घेतली आहेत. जस्टिन ट्रुडो २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान होते, त्यांची जागा कार्नी यांनी घेतली आहे.
 
ट्रम्पच्या परतण्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेतील ऐतिहासिक संबंधांमध्ये दरी निर्माण झाली आणि या आव्हानांमध्ये, नवीन पंतप्रधान मार्क कार्ली यांचे मुख्य लक्ष हे संबंध सुधारण्यावर असेल. कार्ली यांनी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. जे त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण मजबूत करण्यास मदत करू शकते. माजी केंद्रीय बँकर यांची रविवारी कॅनडाच्या लिबरल पार्टीचे नेते म्हणून निवड झाली.

Related Articles