जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात   

ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयाकडे आग्रह

वॉशिंग्टन : जन्मानेच अमेरिकेचे नागरिकत्व देण्याच्या अध्यादेशावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या संदर्भातील निर्णयाला काही प्रमाणात मान्यता द्यावी, अशी मागणी ट्रम्प यांच्या प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. 
 
मेरिलँड, मॅसॅच्युसेट्स आणि वॉशिंग्टन जिल्हा न्यायालयाने अध्यक्षांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास   परवानगी दिली नव्हती. त्या विरोधात उच्च न्यायालयात तातडीचा आव्हान अर्ज प्रशासनाने दाखल केला होता. सध्या देशभरात ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी न्यायालयाच्या आदेशामुळे  केली जात नाही.  या संदर्भातील आव्हान अर्जही तिन्ही न्यायालयांनी फेटाळले आहेत. त्यामध्ये मॅसॅच्युसेट्स न्यायालयाचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या आदेशानुसार १९ फेब्रु वारीनंतर जन्म झालेल्या बालकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात १२  पेक्षा अधिक राज्यांतून अर्ज दाखल झाले आहेत. घटनेच्या १४ व्या कलमानुसार अमेरिकेच्या बाहेर जन्मलेल्या व्यक्तीला नागरिकत्व घेता येते. त्यामुळे ट्रम्प यांचा अध्यादेश चुकीचा असल्याचा दावा विविध गट, संघटना आणि नागरिकांनी केला आहे. 
 

Related Articles